वनपट्टा धारक शेतकऱ्यांसाठी फार्मर आयडी नोंदणी मोहीम सुरू; सीएससीमार्फत मोफत सेवा
बुलढाणा (जिमाका), दि.16 :
राज्यातील वनपट्टा धारक शेतकऱ्यांसाठी Farmer ID नोंदणीची विशेष मोहीम सुरू करण्यात
आली असून, ही नोंदणी नागरी सुविधा केंद्र (CSC) मार्फत राज्यभर राबविण्यात येत आहे.
या नोंदणीसाठी शेतकऱ्यांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नसल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट
करण्यात आले आहे.
भारत
सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार राज्यात डिजिटल कृषी पायाभूत सुविधा उभारण्यासाठी
ॲग्रीस्टॅक (AgriStack) योजनेची अंमलबजावणी सुरू आहे. त्यानुसार, कृषि विभागाच्या विविध
योजनांचा लाभ घेण्यासाठी Farmer ID नोंदणी अनिवार्य करण्यात आली आहे.
वनहक्क
अधिनियम 2006 अंतर्गत अनुसूचित जमाती व पारंपरिक वननिवासी समुदायांना त्यांच्या वनजमिनीवरील
हक्क प्रदान करण्यात आले आहेत. याच पार्श्वभूमीवर वनपट्टा धारक शेतकऱ्यांची Farmer
ID नोंदणी सुलभ करण्यासाठी विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी आपल्या जवळील
CSC केंद्रावर आवश्यक कागदपत्रांसह भेट देऊन तात्काळ Farmer ID नोंदणी करून घ्यावी,
असे आवाहन करण्यात आले आहे. Farmer ID मिळाल्यानंतर शेतकऱ्यांना शासनाच्या विविध कृषी
योजना, अनुदान, पीकविमा, नैसर्गिक आपत्ती सहाय्य तसेच इतर डिजिटल कृषी सेवांचा लाभ
सहज मिळणार आहे.
00000
Comments
Post a Comment