पाणी टंचाई निवारणार्थ बुलढाणा तालुक्यातील पिंपळगाव सराई,हनवतखेड व गिरडा गावासाठी टँकर मंजूर
बुलढाणा
दि.28 (जिमाका): पाणी
टंचाईची तीव्रता लक्षात घेता बुलढाणा तालुक्यातील पिंपळगाव सराई, हनवतखेड व गिरडा गावासाठी
पाणी पुरवठ्याकरिता टँकर मंजूर करण्यात आले आहे. आदेशात ठरवून दिल्याप्रमाणे नियमित
टँकरव्दारे पाणी पुरवठा केल्या जाणार आहे, अशी माहिती बुलढाणा उपविभागीय अधिकारी यांनी
दिली.
पिंपळगाव सराई येथे 592 पशुधन
व 5 हजार 592 लोकसंख्येसाठी एक टॅंकरद्वारे 1 लाख 29 हजार 600 लिटर्स पाणी पुरवठा दररोज
करणार आहेत. हनवतखेड येथे 179 पशुधन व 438 लोकसंख्येसाठी एक टॅंकरद्वारे 14 हजार
420 लिटर्स पाणी पुरवठा दररोज करणार आहेत. गिरडा येथे 330 पशुधन व 1 हजार 16 लोकसंख्येसाठी
एक टॅंकरद्वारे 24 हजार 920 लिटर्स पाणी पुरवठा दररोज करणार आहेत.
पाणी टंचाईची तीव्रता लक्षात
घेता पाणी पुरवठ्याकरिता टँकर मंजूर करण्यात आले आहे. टँकरने केलेल्या खेपांची ग्रामपंचायतीला
नोंद घेण्यात यावी. नोंदवहीची तपासणी नियमितपणे गटविकास अधिकारी यांनी करावी. निवीदाधारकाने
टँकर नादुरूस्त झाल्यास त्वरित दुसरे टँकर उपलब्ध करून द्यावे, असे उपविभागीय अधिकारी
यांनी प्रसिद्धीपत्रकाव्दारे कळविले आहे.
000000
Comments
Post a Comment