शिवछत्रपती क्रीडापीठाच्या क्रीडा प्रबोधिनींसाठी प्रवेश सुरू; 23 एप्रिलपर्यंत नोंदणी करण्याचे आवाहन

 


बुलढाणा (जिमाका), दि.17 : शिवछत्रपती क्रीडापीठ अंतर्गत विविध क्रीडा प्रबोधिनींमध्ये सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षासाठी नवीन खेळाडूंच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. ही प्रवेश प्रक्रिया सरळ प्रवेश व कौशल्य चाचणीच्या माध्यमातून निवासी व अनिवासी खेळाडूंकरिता राबविण्यात येणार आहे.

विभाग व राज्यस्तरीय कार्यक्रम तसेच विभागस्तरावर होणाऱ्या चाचण्यांसाठी खेळाडूंचा डेटा संकलित करण्यासाठी गुगल लिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे. सर्व इच्छुक खेळाडूंनी https://forms.gle/aqnpWXJKP2wsMVpdA या लिंकद्वारे नोंदणी करावी. नोंदणीची अंतिम तारीख २३ एप्रिल २०२६ पर्यंत आहे. यानंतर नोंदणीकृत खेळाडूंची यादी खेळ व चाचणीनिहाय संबंधित विभागीय उपसंचालकांकडे पाठविण्यात येईल.

जे खेळाडू गुगल लिंकवर नोंदणी करणार नाहीत, त्यांच्या नावांची माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी संबंधित विभागीय उपसंचालकांना त्वरित कळवावी. तसेच, चाचणीच्या दिवशी प्रत्यक्ष उपस्थित राहणाऱ्या खेळाडूंनाही चाचणीची संधी देण्यात येणार आहे.

नोंदणीकृत सर्व खेळाडूंना चाचणीचे ठिकाण व दिनांक विभागीय उपसंचालकांकडून कळविण्यात येईल. जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांनी आपल्या जिल्ह्यातील खेळाडूंना ही माहिती पोहोचवावी. क्रीडा प्रबोधिनी प्रवेशासाठी चाचण्या प्रथम विभागस्तरावर व त्यानंतर राज्यस्तरावर आयोजित करण्यात येतील.                                                                                           0000

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

नव्या वर्षात जिल्ह्यात तीन दिवस स्थानिक सुट्टी जाहीर

ग्रामपंचायत सदस्य पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर; हरकती व सूचना २५ जूनपर्यंत मागविल्या