महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा जिल्हा दौरा

 


 

बुलढाणा,दि.16 (जिमाका) : राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे सोमवार दि. 20 एप्रिल 2026 रोजी बुलढाणा जिल्हा दौऱ्यावर येत आहे.

त्यांच्या दौरा कार्यक्रमानुसार सोमवार दि. 20 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजता नागपूर येथून शेगाव हेलीपॅड येथे आगमन व संत गजानन महाराज संस्थानकडे प्रयाण. सकाळी 10.15 वाजता श्री संत गजानन महाराज संस्थान येथे दर्शनासाठी राखीव. सकाळी 11 वाजता शेगाव हेलीपॅड येथून चिखलीकडे रवाना.

 

सकाळी 11.30 वाजता चिखली येथील शेरखजी बोंदरे यांच्या शेतातील हेलीपॅडवर आगमन व कार्यक्रम स्थळी प्रस्थान. दुपारी 11.45 वाजता देव्हडे फार्म ॲन्ड ॲग्रो टुरिझमचे उद्घाटन कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी 1 वाजता चिखली हेलिपॅड येथे आगमन व नागपूरकडे प्रयाण करतील.

0000

Comments

Popular posts from this blog

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाची थेट कर्ज योजना

बुलढाणा जिल्ह्याची महान हो कीर्ती

दत्तक विधान प्रक्रिया; इच्छुक पालकांनी कायदेशीर प्रक्रिया पुर्ण करावी