जनगणना 2027 : स्व-गणनेबाबत 15 दिवसांची विशेष जनजागृती मोहीम

 


बुलढाणा, (जिमाका) दि. 20: जनगणना 2027 च्या पार्श्वभूमीवर स्व-गणना (Self Enumeration) प्रक्रियेबाबत जनमानसामध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी विशेष प्रसिद्धी मोहिमेला सुरुवात करण्यात आली आहे. मुख्य प्रधान जनगणना अधिकारी, जनगणना संचालनालय, मुंबई यांच्या निर्देशानुसार ही मोहीम राबविण्यात येत आहे.

जनगणना कामकाजाचा एक भाग म्हणून नागरिकांना दि. 1 ते 15 मे 2026 या कालावधीत स्व-गणना करणे अपेक्षित आहे. या प्रक्रियेबाबत अधिकाधिक नागरिकांपर्यंत माहिती पोहोचावी यासाठी प्रशासनाने व्यापक प्रसिद्धी देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याअनुषंगाने दि. 20 एप्रिल 2026 पासून पुढील 15 दिवस स्व-गणनेविषयी जनजागृती करण्यात येणार आहे. या माध्यमातून नागरिकांना स्व-गणना प्रक्रियेचे महत्त्व, पद्धत आणि आवश्यक सूचना याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

प्रशासनाने सर्व संबंधित यंत्रणांना या मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले असून, नागरिकांनीही या उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदवून जनगणना 2027 यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाची थेट कर्ज योजना

बुलढाणा जिल्ह्याची महान हो कीर्ती

दत्तक विधान प्रक्रिया; इच्छुक पालकांनी कायदेशीर प्रक्रिया पुर्ण करावी