जागतिक आरोग्य दिनानिमित्त जिल्हा रुग्णालयात विविध उपक्रमांचे आयोजन
बुलढाणा,दि.8 (जिमाका) :
जिल्हा रुग्णालय व परिचारिका प्रशिक्षण केंद्र, बुलढाणा येथे विविध उपक्रमांचे आयोजन
करून जागतिक आरोग्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावर्षीचा घोषवाक्य “एकत्रित
प्रयत्न आरोग्यासाठी, विज्ञानाची साथ भविष्यासाठी”
यावर आधारित कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
जिल्हा
शल्य चिकित्सक डॉ. दत्तात्रय बिराजदार व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अमोल गीते यांच्या
मार्गदर्शनाखाली कार्यक्रम पार पडला. यावेळी प्राचार्य उज्वला खेडेकर, मेट्रन आरती
कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमादरम्यान
जागतिक आरोग्य दिनाचे महत्त्व अधोरेखित करत आरोग्य विषयक विविध शासकीय योजनांचा आढावा
घेण्यात आला. प्राथमिक आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्यासाठी जनजागृती आणि प्रतिबंधात्मक
उपाययोजनांच्या प्रभावी अंमलबजावणीवर विशेष भर देण्यात आला.
मार्गदर्शनपर
भाषणात जोशी सर यांनी निरोगी समाज निर्मितीसाठी सर्व घटकांनी एकत्रित प्रयत्न करण्याचे
आवाहन केले. आधुनिक विज्ञानाच्या साहाय्याने आरोग्य सेवा अधिक प्रभावी करता येतात,
तसेच स्वच्छता, संतुलित आहार आणि नियमित व्यायाम यांचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले.
यावेळी
“माझे गाव, आरोग्य संपन्न गाव”
मोहिमेअंतर्गत जिल्ह्यात राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती देण्यात आली.
ग्रामीण भागात जनजागृतीसाठी सोशल मीडिया, स्थानिक माध्यमे, वृत्तपत्रे व यशोगाथांचा
प्रभावी वापर करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. कार्यक्रमात आरोग्य पर्यवेक्षक
अनिल लोखंडे यांनी सविस्तर मार्गदर्शन केले, तसेच परिचारिका प्रशिक्षणार्थींनी मनोगत
व्यक्त केले. कार्यक्रमास आरोग्य विभागातील अधिकारी, कर्मचारी व प्रशिक्षणार्थी मोठ्या
संख्येने उपस्थित होते.
00000
Comments
Post a Comment