खाजगी नोकरी इच्छुकांसाठी सुवर्णसंधी; बुलढाण्यात 13 एप्रिलला प्लेसमेंट ड्राइव्ह
बुलढाणा
(जिमाका), दि.10 : बुलढाणा जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांसाठी
नोकरीची संधी उपलब्ध झाली असून, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन
केंद्र तथा मॉडेल करिअर सेंटर, बुलढाणा आणि मूलभूत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सूचना केंद्र
(BTRI), खामगाव यांच्या संयुक्त विद्यमाने ‘पंडित दीनदयाल उपाध्याय प्लेसमेंट ड्राइव्ह’चे
आयोजन करण्यात आले आहे.
ही प्लेसमेंट ड्राइव्ह सोमवार, दि.
13 एप्रिल 2026 रोजी सकाळी 10 वाजता शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI), नांदुरा,
जि. बुलढाणा येथे आयोजित करण्यात आली आहे. या मेळाव्यात चिरायु पॉवर (खामगाव), क्रेडिट
अॅक्सीस ग्रामीण (नांदुरा) आणि क्वीज कॉर्प (पुणे) यांसारख्या नामांकित कंपन्या सहभागी
होणार असून विविध रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.
या उपक्रमाद्वारे उमेदवारांच्या थेट
मुलाखती घेऊन प्राथमिक निवड करण्यात येणार आहे. तसेच निवड झालेल्या उमेदवारांना नामांकित
कंपन्यांमध्ये प्रत्यक्ष प्रशिक्षणाची संधी देखील उपलब्ध होणार आहे. दहावी, बारावी,
आयटीआय तसेच पदवीधर पुरुष व महिला उमेदवारांनी या मेळाव्यात सहभागी व्हावे, असे आवाहन
करण्यात आले आहे. पात्र उमेदवारांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार एकापेक्षा अधिक
पदांसाठी मुलाखत देण्याची संधी मिळणार आहे.
उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रांसह दि.
13 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजता प्रत्यक्ष उपस्थित राहून नोंदणी करावी व संबंधित कंपनी
प्रतिनिधींसमवेत मुलाखत द्यावी, असे आवाहन सहायक आयुक्त ग. प्र. बिटोडे यांनी केले
आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र,
बुलढाणा येथील दूरध्वनी क्रमांक 07262-242642 वर संपर्क साधावा.
0000
Comments
Post a Comment