शिवछत्रपती क्रीडापीठांतर्गत क्रीडा प्रबोधिनींसाठी प्रवेश प्रक्रिया सुरु
बुलढाणा (जिमाका), दि.
9 : राज्यात गुणवंत खेळाडू घडविण्यासाठी शिवछत्रपती क्रीडापीठ,
पुणे अंतर्गत विविध क्रीडा प्रबोधिनी केंद्रांमध्ये सन 2026-27 या वर्षासाठी 19 वर्षांखालील
खेळाडूंच्या निवडीची प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. सरळ प्रवेश तसेच खेळनिहाय कौशल्य
चाचणीद्वारे निवासी प्रवेश दिला जाणार आहे.
राज्यातील
अमरावती, नागपूर, अकोला, गडचिरोली, ठाणे, नाशिक, कोल्हापूर, औरंगाबाद आणि पुणे येथे
क्रीडा प्रबोधिनी केंद्रे कार्यरत असून, नव्या प्रशिक्षणार्थींची निवड प्रस्तावित आहे.
या प्रबोधिनींमध्ये आर्चरी, ज्युदो, हॅण्डबॉल, अॅथलेटिक्स, बॉक्सिंग, बॅडमिंटन, शूटिंग,
कुस्ती, हॉकी, टेबल टेनिस, वेटलिफ्टिंग, जिम्नॅस्टिक्स, जलतरण, फुटबॉल, ट्रायथलॉन व
सायकलिंग अशा एकूण 16 क्रीडा प्रकारांमध्ये प्रशिक्षण दिले जाते.
क्रीडा
प्रबोधिनीतील असलेल्या संबंधित खेळ राज्यस्तरावर पदक प्राप्त केलेले खेळाडू तसेच राष्ट्रीय
स्तरावरील सहभागी खेळाडूंची तज्ज्ञ समितीद्वारे चाचणी घेऊन पात्र खेळाडूंची निवड केली
जाणार आहे. वैद्यकीय चाचणीमध्ये निवड झालेल्या शारीरिक दृष्ट्या सुदृढ खेळाडूंची निवड
करण्यात येईल. क्रीडा प्रबोधिनी प्रवेशासाठी अर्जदार हा 19 वर्षाखालील तसेच महाराष्ट्र
राज्याचा रहीवासी असणे अनिवार्य आहे.
क्रीडा
प्रबोधिनी प्रवेशासाठी खेळाडूकडे राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरील सहभागी
स्पर्धेतील प्रमाणपत्रे, आधारकार्ड तसेच नगरपालिका / ग्रामपंचायत यांनी दिलेले जन्म
प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. पात्र खेळाडूंनी
राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरील सहभागी स्पर्धेतील प्रमाणपत्रे, आधारकार्ड
तसेच नगरपालिका/ ग्रामपंचायत यांनी दिलेले जन्म प्रमाणपत्र जोडून जिल्हा क्रीडा अधिकारी
कार्यालय, बुलडाणा येथे दि.24 एप्रिल 2026
पुर्वी सादर करावे. सदर अर्जात खेळाडूचा
संपर्क क्रमांक, पुर्ण पत्ता, ई-मेल आयडी नमुद करावा.
विभागस्तरावर
चाचण्यांचे आयोजन दि. 27 ते 30 एप्रिल 2026 या कालावधीत विभाग स्तरावर होणार आहे. तरी बुलडाणा जिल्ह्यातील पात्र संबंधीत खेळाडूंनी
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा संकुल, क्रीडानगरी, जांभरुन रोड, बुलडाणा
येथुन अर्ज प्राप्त करुन आवश्यक कागदपत्रासह दि.24 एप्रिल 2026 पर्यंत सादर करावे.
तसेच अधिक माहितीकरीता जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, बुलडाणा येथे संपर्क साधावा,
असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी बी. एस. महानकर यांनी केले आहे.
0000000
Comments
Post a Comment