बुलढाणा जिल्ह्याची उद्योजकतेकडे यशस्वी झेप; मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाचे 100 टक्के उद्दिष्ट पूर्ण
बुलढाणा जिल्ह्याची
उद्योजकतेकडे यशस्वी झेप;
मुख्यमंत्री रोजगार
निर्मिती कार्यक्रमाचे 100 टक्के उद्दिष्ट पूर्ण
बुलढाणा
(जिमाका), दि. 7 : जिल्ह्यातील स्थानिक उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी राबविण्यात
येणाऱ्या 'मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमात' (CMEGP) बुलढाणा जिल्ह्याने उल्लेखनीय
कामगिरी केली आहे. आर्थिक वर्ष 2025-26 च्या आकडेवारीनुसार, जिल्ह्याने आपल्या मंजुरीचे
100 टक्के उद्दिष्ट साध्य करून अमरावती विभागात आणि राज्यस्तरावर आपले स्थान बळकट केले
आहे.
बुलढाणा
जिल्ह्यासाठी या वर्षाकरिता एकूण 780 अर्जांचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले होते.
बँकांनी या सर्व 780 अर्जांना मंजुरी देऊन जिल्ह्याचे उद्दिष्ट पूर्णत्वास नेले आहे.
या यशातून जिल्ह्याने स्थानिक तरुणांना आर्थिक पाठबळ देण्यात आघाडी घेतली आहे. मार्जिन मनी
मंजुर झालेल्या 780 अर्जांसाठी एकूण 1287.24 लाख रुपयांचा मार्जिन मनी निधी निश्चित करण्यात आला
आहे. आतापर्यंत 237 अर्जांसाठी 530.34 लाख रुपयांचे प्रत्यक्ष वितरण पूर्ण झाले असून,
यामुळे अनेक नवीन उद्योगांना प्रत्यक्षात सुरुवात झाली आहे.
अमरावती विभागामध्ये बुलढाणा जिल्ह्याने
आपली प्रगती कायम राखली असून बुलढाणा जिल्हा विभागात तिसऱ्या क्रमांकावर आहे. तसेच
राज्यात
सांगली आणि कोल्हापूर सारख्या उद्योगात आघाडीवर असलेल्या जिल्ह्यांच्या तुलनेत बुलढाणा
100 टक्के कामगिरीसह प्रगतीपथावर आहे. बुलढाणा जिल्ह्याने साध्य केलेले हे
यश जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगारांसाठी रोजगाराच्या नवीन संधी निर्माण करणारे ठरणार
आहे. जिल्हा प्रशासनाच्या नियोजनामुळे आणि बँकांच्या सहकार्यामुळे हे उद्दिष्ट वेळेत
पूर्ण करणे शक्य झाले आहे.
0000
Comments
Post a Comment