‘माझं गाव, आरोग्य संपन्न गाव’अभियानांतर्गत जिल्हास्तरीय प्रशिक्षण कार्यशाळा उत्साहात संपन्न

 


 

बुलढाणा, (जिमाका) दि. 21 :   ‘माझं गाव, आरोग्य संपन्न गावअभियानाच्या पार्श्वभूमीवर सर्वसमावेशक प्राथमिक आरोग्य सेवा (CPHC) या विषयावर जिल्हास्तरीय प्रशिक्षण व कार्यशाळा उत्साहात पार पडली.

ही कार्यशाळा जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अमोल गिते यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आली. कार्यशाळेचे अध्यक्षस्थान सार्वजनिक आरोग्य सेवा विभागाचे प्रधान सचिव डॉ. निपुण विनायक यांनी भूषविले. यावेळी सार्वजनिक आरोग्य विभागाचे उपसचिव विलासजी बेद्रे प्रमुख उपस्थित होते.

 

कार्यशाळेदरम्यान डॉ. निपुण विनायक यांनी प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून उपस्थितांशी संवाद साधत सर्वसमावेशक प्राथमिक आरोग्य सेवांचे महत्त्व अधोरेखित केले. आरोग्य सेवा अधिक प्रभावी व लोकाभिमुख करण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवर त्यांनी विशेष भर दिला. जिल्हा परिषद बुलढाणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाब खरात यांनी जिल्ह्यात राबविण्यात येणाऱ्या विविध आरोग्य उपक्रमांविषयी मनोगत व्यक्त केले.

 

दरम्यान, बुलढाणा जिल्हा दौऱ्यादरम्यान डॉ. निपुण विनायक यांनी मलकापूर येथील उपजिल्हा रुग्णालयाला पहाटे भेट देऊन कामकाजाची पाहणी केली. त्यानंतर प्राथमिक आरोग्य केंद्र शेलगाव आटोळ व उपकेंद्र भरोसा येथे भेट देत आरोग्य सुविधांची पाहणी केली. तसेच भरोसा येथील महिला सरपंच बालाबाई हटकर यांच्याशी संवाद साधून नागरिकांच्या आरोग्य सेवांविषयी माहिती जाणून घेतली.

 

 बुलढाणा येथील रेसिडेन्सी क्लब येथे जिल्हास्तरीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेस उपसंचालक डॉ. सुशील वाकचौरे (अकोला मंडळ), जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दत्तात्रय बिराजदार, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रणजीत मंडाले, सहाय्यक संचालक तरंग तुषारवारे, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भागवत भुसारी, सहाय्यक संचालक (कुष्ठरोग) डॉ. हरि पवार, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. वर्षा गुट्टे, जिल्हा माता-बाल संगोपन अधिकारी डॉ. मिलिंद जाधव, जिल्हा आयुष अधिकारी डॉ. प्रशांत तांगडे यांच्यासह जिल्ह्यातील वैद्यकीय अधीक्षक, तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, आयुष अधिकारी, आरोग्य कर्मचारी व आशा स्वयंसेविका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. शैलेश खंडारे यांनी केले.

00000

Comments

Popular posts from this blog

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाची थेट कर्ज योजना

बुलढाणा जिल्ह्याची महान हो कीर्ती

दत्तक विधान प्रक्रिया; इच्छुक पालकांनी कायदेशीर प्रक्रिया पुर्ण करावी