डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त राज्यस्तरीय निबंध स्पर्धा

 


बुलढाणा (जिमाका), दि.16 : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महिलांसाठी केलेले कार्य या विषयावर आधारित असून दोन गटांत आयोजित करण्यात आली आहे.

गट क्रमांक एकमध्ये आयटीआय, डिप्लोमा, बायफोकल, एमसीव्हीसी प्रशिक्षणार्थी व उत्तीर्ण विद्यार्थी तर दुसऱ्या गटात खुला गट (पुरुष व महिला) आहे. निबंधासाठी शब्दमर्यादा गट क्र. १ साठी ५०० ते ८०० शब्द, तर गट क्र. २ साठी ८०० ते १२०० शब्द अशी निश्चित करण्यात आली आहे. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या स्पर्धकांनी आपला निबंध जाहीरातीत नमूद केलेल्या गुगल फॉर्म (QR कोड / लिंक) द्वारेच पीडीएफ स्वरूपात सादर करावा. निबंध सादर करण्याचा कालावधी १४ एप्रिल २०२६ ते २० एप्रिल २०२६ असा राहणार आहे.

प्रत्येक गटासाठी आकर्षक पारितोषिके जाहीर करण्यात आली आहेत. प्रथम क्रमांकासाठी ३१ हजार रुपये, द्वितीय क्रमांकासाठी २१ हजार रुपये आणि तृतीय क्रमांकासाठी ११ हजार रुपये तसेच स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र देण्यात येणार आहे.

निबंध मराठी भाषेत लिहिणे अनिवार्य असून तो पूर्णतः मौलिक असावा. कॉपी आढळल्यास संबंधित स्पर्धक अपात्र ठरणार आहे. प्रत्येक स्पर्धकाने एकच निबंध सादर करावा. निबंध हस्तलिखित किंवा टंकलिखित स्वरूपात स्वीकारला जाणार असून अंतिम सादरीकरण पीडीएफ स्वरूपात करणे आवश्यक आहे. स्पर्धकांनी निबंध अपलोड करताना आपले पूर्ण नाव, गट क्रमांक, संपर्क क्रमांक, शाळा/महाविद्यालयाचे नाव व संपूर्ण पत्ता यांची माहिती भरणे बंधनकारक आहे. या स्पर्धेत प्रशिक्षणार्थी व नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवावा, असे आवाहन खामगाव शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थाचे प्राचार्य, गटनिदेशक व कार्यालयीन अधीक्षक यांनी केले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाची थेट कर्ज योजना

बुलढाणा जिल्ह्याची महान हो कीर्ती

दत्तक विधान प्रक्रिया; इच्छुक पालकांनी कायदेशीर प्रक्रिया पुर्ण करावी