बुलढाणा जिल्ह्यातील तलाव मासेमारी ठेका प्रक्रिया सुरू; तोरणा तलावासाठी प्रस्ताव आमंत्रित

 


 

बुलढाणा, दि. 22 (जिमाका) : कृषी व पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभागाच्या दि. 3 जुलै 2019 च्या शासन निर्णयानुसार सुधारीत तलाव/जलाशय धोरण राबविण्यात येत असून, सन 2026-27 या वर्षाकरिता बुलढाणा जिल्ह्यातील 500 हेक्टरखालील तलावांपैकी तोरणा तलाव(112 हेक्टर) मासेमारी ठेक्याने देण्यासाठी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

 

सदर तलावाची ठेका मुदत दि. 30 जून 2026 रोजी संपुष्टात येत असून, शासन निर्णयातील अटी व शर्तींनुसार संबंधित कार्यक्षेत्रातील नोंदणीकृत मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थांना जिल्हास्तरीय तलाव ठेका समितीच्या मान्यतेने नवीन ठेका देण्याचा प्रस्ताव आहे.

 

आवश्यक कागदपत्रे : सन २०२६-२७ या वर्षासाठी तलाव ठेका प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी इच्छुक मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थांनी विहीत नमुन्यातील अर्ज (तलाव ठेका नमुना-1) व संस्थेचा ठराव, संस्था नोंदणी प्रमाणपत्र, उपविधी व नाहरकत प्रमाणपत्र, संस्था कार्यरत असल्याचे प्रमाणपत्र, थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र, संचालक मंडळाची यादी, मागील तीन वर्षांचे लेखापरीक्षण अहवाल, बँक स्टेटमेंट व नफा-तोटा पत्रक, मागील 5 वर्षांचा मत्स्यबीज संचयन व उत्पादन अहवाल, इतर पूरक माहिती (किसान क्रेडिट कार्ड, विमा, ई-श्रम कार्ड, NFDP इ.), 10 टक्के मत्स्यबीज संचयनासाठी अगाऊ धनादेश, एकाच कुटुंबातील एकापेक्षा जास्त सदस्य नसल्याचे प्रमाणपत्र, सविस्तर प्रकल्प अहवाल व हमीपत्र, नवीन ठेका प्रक्रियेस प्रारंभ, यासोबतच पाटबंधारे विभागाच्या ज्या तलावांची ठेका मुदत दि. 30 जून 2025 रोजी संपली आहे, त्या तलावांचेही नव्याने मासेमारी ठेक्याने वाटप करण्याची प्रक्रिया प्रस्तावित करण्यात आली आहे.

 

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध असून, इच्छुक संस्थांनी अधिक माहितीसाठी सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय (तांत्रिक), बुलढाणा कार्यालयाशी संपर्क साधावा किंवा कार्यालयाच्या नोटीस बोर्डची पाहणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

000000

Comments

Popular posts from this blog

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाची थेट कर्ज योजना

बुलढाणा जिल्ह्याची महान हो कीर्ती

दत्तक विधान प्रक्रिया; इच्छुक पालकांनी कायदेशीर प्रक्रिया पुर्ण करावी