प्रशिक्षणार्थ्यांसाठी भोजन पुरवठा करण्यासाठी बंद निविदा आमंत्रित
बुलढाणा (जिमाका), दि.16 : सेंट
ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था, जांभरुण रोड, बुलढाणा येथे प्रशिक्षण घेणाऱ्या
प्रशिक्षणार्थ्यांसाठी भोजन पुरवठा करण्याबाबत बंद निविदा मागविण्यात येत आहेत. इच्छुक
व पात्र पुरवठादारांनी दि. 20 एप्रिल 2026 पर्यंत आपली बंद निविदा संस्थेच्या कार्यालयात
सादर करावी.
इच्छुकांनी
प्रथम संस्थेच्या कार्यालयात प्रत्यक्ष भेट देऊन सेवेसंदर्भातील सविस्तर अटी व शर्तीचे
पत्र प्राप्त करून घ्यावे. त्यानंतर सर्व आवश्यक कागदपत्रांसह नियोजित मुदतीपूर्वी
निविदा सादर करणे बंधनकारक राहील. सदर निविदा सेंट ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था,
बुलढाणा शाखा येथेच स्वीकारण्यात येणार असून मुदतीनंतर प्राप्त झालेल्या निविदांचा
विचार केला जाणार नाही. अधिक माहितीसाठी अभंग बिल्डिंग, जांभरुण रोड, विठ्ठल नगर, जनशिक्षण
संस्थेच्या बाजूला, बुलढाणा येथे किंवा मो. क्रमांक 9096134500 / 9503674013 /
7499458239 / 8879607576 वर संपर्क साधावा.
000000
Comments
Post a Comment