महाराष्ट्र दिनाच्या सुटीमुळे मलकापूर येथील दिव्यांग तपासणी शिबीर रद्द

 


बुलढाणा दि.29 (जिमाका): उपजिल्हा रुग्णालय मलकापूर येथे नियमितपणे प्रत्येक शुक्रवारी नेत्र, मतिमंद/मनोरुग्ण तसेच कान-नाक-घसा संबंधित दिव्यांग तपासणी बोर्ड आयोजित करण्यात येते. मात्र, दिनांक १ मे २०२६ रोजी महाराष्ट्र दिनानिमित्त शासकीय सुटी असल्याने या दिवशी आयोजित करण्यात आलेले दिव्यांग तपासणी शिबीर रद्द करण्यात आले आहे.

यामध्ये नेत्र, मतिमंद/मनोरुग्ण आणि कान-नाक-घसा संबंधित दिव्यांग तपासणीचा समावेश आहे. त्यामुळे संबंधित दिव्यांग व्यक्तींनी दिनांक १ मे २०२६ रोजी तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालय मलकापूर अथवा जिल्हा रुग्णालय बुलढाणा येथे येऊ नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

तसेच, सुटीच्या दिवशी तपासणी सेवा उपलब्ध नसल्यामुळे नागरिकांनी गैरसोय टाळण्यासाठी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे. अन्यथा झालेल्या गैरसोईस प्रशासन जबाबदार राहणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाची थेट कर्ज योजना

बुलढाणा जिल्ह्याची महान हो कीर्ती

दत्तक विधान प्रक्रिया; इच्छुक पालकांनी कायदेशीर प्रक्रिया पुर्ण करावी