खामगाव शासकीय वसतिगृहासाठी पाणीपुरवठा निविदा आमंत्रित

 


बुलढाणा: दि 01 (जिमाका): भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलांचे शासकीय वसतिगृह, खामगाव घाटपुरी येथे सन 2026-27 सत्रासाठी विद्यार्थ्यांच्या पिण्याच्या पाण्याची व स्नान स्वच्छतेसाठी टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी निविदा मागविण्यात येत आहेत.

या निविदेनुसार टँकरद्वारे 5000 लिटर पाणीपुरवठा तसेच R.O. शुद्ध पाणी 18 लिटरच्या कॅनच्या दरासह पुरवठा करण्याची अट आहे. इच्छुक पुरवठादारांनी आपली दरपत्रकासह निविदा बंद लिफाफ्यात सादर कराव्यात. निविदा सादर करण्याची अंतिम तारीख 7 एप्रिल 2026 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत असून, त्या वसतिगृह कार्यालयात जमा कराव्यात. इच्छुकांनी वेळेत निविदा सादर करून या प्रक्रियेत सहभागी व्हावे, असे आवाहन गृहपाल श्री डी. बी. बोथिंगे यांनी केले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाची थेट कर्ज योजना

बुलढाणा जिल्ह्याची महान हो कीर्ती

दत्तक विधान प्रक्रिया; इच्छुक पालकांनी कायदेशीर प्रक्रिया पुर्ण करावी