जळगाव जामोद तालुक्यातील ग्रामपंचायत पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर; २८ एप्रिलला होणार मतदान

 

जळगाव जामोद तालुक्यातील ग्रामपंचायत पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर;

२८ एप्रिलला होणार मतदान

 

 बुलढाणा दि ६ (जि मा का): राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जळगाव जामोद तालुक्यातील रिक्त असलेल्या सरपंच आणि सदस्य पदांच्या पोटनिवडणुकीचा अधिकृत कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून २८ एप्रिल २०२६ रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. यामध्ये भिंगारा ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासह तालुक्यातील कुंवरदेव, मडाखेड खुर्द, मांडवा, माहुली, गोळेगाव खुर्द, मडाखेड बु., निंभोरा बु. आणि जामोद या ग्रामपंचायतींमधील रिक्त जागांसाठी ही निवडणूक होत आहे.

७ एप्रिल ते १३ एप्रिल या कालावधीत सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत इच्छुक उमेदवारांना आपले नामनिर्देशन पत्र सादर करता येतील. त्यानंतर १५ एप्रिल रोजी अर्जांची छाननी केली जाईल आणि १७ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत असेल. २८ एप्रिल रोजी सकाळी ७:३० ते सायंकाळी ५:३० या वेळेत मतदान होईल आणि २९ एप्रिल रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर करण्यात येईल. निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्याने संबंधित ग्रामपंचायत क्षेत्रात आचारसंहिता लागू करण्यात आली असून, तहसीलदार पवन पाटील यांनी सर्व नागरिकांनी या निवडणूक प्रक्रियेची नोंद घ्यावी असे आवाहन केले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाची थेट कर्ज योजना

बुलढाणा जिल्ह्याची महान हो कीर्ती

दत्तक विधान प्रक्रिया; इच्छुक पालकांनी कायदेशीर प्रक्रिया पुर्ण करावी