महाडीबीटीद्वारे बियाणे व पीक प्रात्यक्षिकांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू; शेतकऱ्यांना लाभ घेण्याचे आवाहन

 


 

बुलढाणा दि.28 (जिमाका): राष्ट्रीय अन्न सुरक्षा व पोषण अभियान, कडधान्य आत्मनिर्भर अभियान तसेच राष्ट्रीय खाद्य तेल (गळीतधान्य) अभियान सन 2026-27 अंतर्गत विविध योजनांच्या अंमलबजावणीसाठी जिल्ह्यात अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या अंतर्गत गळीतधान्य, अन्नधान्य, तृणधान्य, भरडधान्य व कडधान्य पिकांसाठी पीक प्रात्यक्षिके तसेच प्रमाणित बियाणे वितरण हे घटक राबविण्यात येणार आहेत.

 

या योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी महाडीबीटी (MahaDBT) प्रणालीद्वारे ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक असून, त्यासाठी प्रक्रिया सध्या सुरू झाली आहे. इच्छुक शेतकऱ्यांनी mahadbt.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर जाऊन संबंधित घटकासाठी अर्ज सादर करावा. जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी संतोष डाबरे यांनी केले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

बुलढाणा जिल्ह्याची महान हो कीर्ती

दत्तक विधान प्रक्रिया; इच्छुक पालकांनी कायदेशीर प्रक्रिया पुर्ण करावी