जिल्हा रुग्णालयातील शुक्रवारचे(दि.3) दिव्यांग तपासणी शिबीर रद्द
बुलडाणा, (जिमाका) दि. 2 : जिल्हा रुग्णालय, बुलडाणा येथे दर शुक्रवारी नियमितपणे
नेत्र, मतिमंद/मनोरुग तसेच कान-नाक-घसा संबंधित दिव्यांग तपासणीसाठी विशेष बोर्ड आयोजित
केला जातो. मात्र येत्या 3 एप्रिल 2026 रोजी ‘गुड फ्रायडे’ निमित्त शासकीय सुट्टी असल्याने
या दिवशी होणारे दिव्यांग तपासणी शिबीर रद्द करण्यात आले आहे.
सदर दिवशी (पहिला शुक्रवार) नेत्र, मतिमंद/मनोरुग व कान-नाक-घसा
संबंधित दिव्यांग तपासणी होणार नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे नागरिकांनी
3 एप्रिल रोजी जिल्हा रुग्णालयात तपासणीसाठी येऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे. तरीही
कोणी नागरिक तपासणीसाठी आले, तर होणाऱ्या गैरसोयीस प्रशासन जबाबदार राहणार नसल्याचेही
स्पष्ट करण्यात आले आहे.
000
Comments
Post a Comment