क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमात बुलढाण्याची उल्लेखनीय झेप; राज्यात अव्वल पाचमध्ये

 


बुलढाणा दि. 24 (जिमाका): केंद्र सरकारने निश्चित केलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार आणि निर्देशांकाच्या आधारावर राज्यस्तरावरुन राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमाचे मुल्यांकन करण्यात आले आहे. सदर मुल्यांकन १ जानेवारी २०२५ ते ३१ डिसेंबर २०२५ या कालावधीतील कामगिरी बर आधारित करुन या मुल्यांकनामध्ये बुलडाणा जिल्हयाने राज्यस्तरावर पहिल्या ५ मध्ये स्थान मिळवुन उल्लेखनिय कामगिरी केली आहे. या कार्यक्रमा अंतर्गत जिल्हाधिकारी मा. डॉ. प्रविणकुमार देवरे, मुख्य कार्यकारी अधिकारी मा. गुलाबराव खरात जिल्हा परिषद, डॉ. सुशिल बाकचीरे उपसंचालक, आरोग्य सेवा, अमोला मंडळ, अकोला डॉ. अमोल गिते, जिल्हा आरोग्य अधिकारी, डॉ. दत्तात्रय विराजवार, जिल्हा शल्यचिकित्सक, यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. वर्षा गु‌ट्टे, जिल्हा क्षयरोग अधिकारी, यांनी यशस्वी कामगिरी केली आहे.

दिनांक २२/०४/२०२६ रोजी मा. केंद्रीय आयुष मंत्री (स्वतंत्र प्रभार) आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री मा. प्रतावराव जाधव यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय अधिकारी व कर्मचारी यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या आरोग्य विभागाच्या आढावा सभेमध्ये जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. वर्षा श्रीधर गुटट्टे, यांचे अभिनंदन करण्यात आले.

सदर आढावा सभेला जिल्हाधिकारी मा. डॉ. प्रविणकुमार देवरे, मुख्य कार्यकारी अधिकारी मा. गुलाबराव खरात जिल्हा परिषद. मा. डॉ. राजरत्न वाघमारे, सहसंचालक, आरोग्य सेवा (क्षय व कृष्ठ) पुणे, मा. डॉ. सुनिता गोलाईत, सहसंचालक रुग्णालय राज्यस्तर मुंबई. डॉ. बाळासाहेब सोनवणे सहसंचालक, तात्रीक मुंबई. मा. डॉ. किरण कुमार वाघमारे, सहाय्यक सहसंचालक, मुंबई, डॉ. विलास सरवदे आयुष संचालक, आरोग्य सेवा, मुंबई, डॉ. प्रसाद भंडारी, सहसंचालक, आरोग्य सेवा मुंबई. मा. डॉ. सुभाष मोनालकर, उपसंचालक, मुंबई, डॉ. सुशिल बाकचौरे उपसंचालक, आरोग्य सेवा, अोला, डॉ. अमोल गिते, जिल्हा आरोग्य अधिकारी, डॉ. दत्तात्रय बिराजदार, जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. कैलास झिने अधिष्ठाता शासकिय वैद्यगित्य महाविद्यालम उपस्थित होते.

00000

Comments

Popular posts from this blog

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाची थेट कर्ज योजना

बुलढाणा जिल्ह्याची महान हो कीर्ती

दत्तक विधान प्रक्रिया; इच्छुक पालकांनी कायदेशीर प्रक्रिया पुर्ण करावी