साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळातर्फे कार्यशाळेचे आयोजन

 


बुलढाणा दि.27 (जिमाका): मातंग समाज तसेच तत्सम बारा पोटजातीतील वंचित घटकांच्या सर्वांगीण विकासासाठी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळ, जिल्हा कार्यालय बुलढाणा (मर्या) यांच्या वतीने विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. ही कार्यशाळा मंगळवार दि. 5 मे 2026 रोजी सकाळी 11 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, चिखली रोड, बुलढाणा येथे आयोजित करण्यात येणार आहे.

                सदर कार्यशाळेचा मुख्य उद्देश मातंग समाजातील नागरिकांना विविध शासकीय योजनांची सविस्तर माहिती देणे, त्यांचा लाभ मिळवून देणे तसेच समाजाचे जीवनमान उंचावणे हा आहे. या कार्यशाळेत विविध योजनांबाबत मार्गदर्शन, शंका निरसन आणि लाभार्थ्यांसाठी आवश्यक प्रक्रिया याबाबत माहिती दिली जाणार आहे. मातंग व मांग समाजातील नागरिकांनी वेळेत उपस्थित राहून या कार्यशाळेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक दि. शं. पाखमोडे यांनी केले आहे.

0000

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

बुलढाणा जिल्ह्याची महान हो कीर्ती

दत्तक विधान प्रक्रिया; इच्छुक पालकांनी कायदेशीर प्रक्रिया पुर्ण करावी