पालकमंत्री मकरंद पाटील यांचा जिल्हा दौरा; महाराष्ट्र दिनी ध्वजारोहणाला उपस्थिती

 


          बुलढाणा,दि.27 (जिमाका) : राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. मकरंद पाटील हे दि. 29 एप्रिल ते 1 मे 2026 दरम्यान तीन दिवसांच्या जिल्हा दौऱ्यावर येणार असून विविध विभागांचा आढावा घेणारआहेत. तसेच महाराष्ट्र दिनानिमित्त होणाऱ्या शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमासही ते उपस्थित राहणार आहेत.

                त्यांच्या दौरा कार्यक्रमानुसार बुधवार दि. 29 एप्रिल रोजी रात्री 8 वाजता मुबई येथून शासकीय विश्रामगृह येथे आगमन व राखीव. गुरुवार दि. 30 रोजी 11 वाजता अभ्यागतांसाठी राखीव, दुपारी 1 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथे खरीप हंगाम-2026 आढावा, टंचाई आढावा, पांदण रस्ते आढावा बैठक. दुपारी 3 वाजता खडकपुर्णा प्रकल्पाअंतर्गत विविध विषयांबाबत बैठक व दुपारी 4 वाजता जिगाव प्रकल्पाबाबत आढावा बैठक स्थळ : जिल्हाधिकारी कार्यालय, बुलढाणा. सायंकाळी 5.30 वाजता राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी पदाधिकारी यांची बैठक.

                शुक्रवार दि. 1 मे रोजी सकाळी 8 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, बुलढाणा येथे महाराष्ट्र दिनानिमित्त शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमासाठी उपस्थिती व दुपारी सोईनुसार साताराकडे प्रयाण करतील.

000000

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

बुलढाणा जिल्ह्याची महान हो कीर्ती

दत्तक विधान प्रक्रिया; इच्छुक पालकांनी कायदेशीर प्रक्रिया पुर्ण करावी