बुलढाणा जिल्ह्यात 'जनगणना 2027' च्या पहिल्या टप्प्यातील क्षेत्रीय प्रशिक्षणास प्रारंभ

 



बुलढाणा जिल्ह्यात 'जनगणना 2027' च्या पहिल्या टप्प्यातील क्षेत्रीय प्रशिक्षणास प्रारंभ

            बुलढाणा (जिमाका), दि. 7 : जनगणना 2027 च्या पूर्वतयारीचा भाग म्हणून, पहिल्या टप्प्यातील क्षेत्रीय प्रशिक्षकांचे (फिल्ड ट्रेनर) जिल्हास्तरीय प्रशिक्षण जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात उत्साहात सुरू झाले आहे. हे प्रशिक्षण 11 एप्रिल 2026 पर्यंत चालणार असून, याद्वारे आगामी जनगणनेच्या तांत्रिक आणि क्षेत्रीय कामाची पायाभरणी केली जात आहे.

या पाच दिवशीय प्रशिक्षण कार्यक्रमाचा शुभारंभ सोमवार, 6 एप्रिल रोजी करण्यात आला. यावेळी बुलढाण्याचे जिल्हाधिकारी तथा प्रधान जनगणना अधिकारी डॉ. प्रवीणकुमार देवरे यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांच्यासोबतच जनगणना संचालनालयाच्या कार्यालयातील सांख्यिकी अन्वेषक (ग्रेड २) पवन घोडे आणि  मयूर पवार यांनी मार्गदर्शन केले.

            यावेळच्या जनगणनेचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे ही प्रक्रिया डिजिटल स्वरूपात पार पडणार आहे. प्रशिक्षणादरम्यान क्षेत्रीय प्रशिक्षकांना डिजिटल जनगणनेची माहिती, मोबाईल ॲपचा वापर आणि माहिती संकलित करण्याच्या आधुनिक पद्धतींबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात येत आहे.

जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली हे प्रशिक्षण दोन सत्रांमध्ये आयोजित करण्यात आले आहे. यामध्ये मास्टर ट्रेनर म्हणून संजय खडसे (उपविभागीय अधिकारी, सिंदखेड राजा) व डॉ. रामेश्वर पुरी (उपविभागीय अधिकारी, खामगाव) हे अधिकारी क्षेत्रीय प्रशिक्षकांना सखोल प्रशिक्षण देत आहेत. या जिल्हास्तरीय प्रशिक्षणासाठी जिल्ह्यातील सर्व नियुक्त क्षेत्रीय प्रशिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. हे प्रशिक्षित फिल्ड ट्रेनर पुढे जाऊन प्रत्यक्ष जनगणनेच्या कामात सहभागी होणाऱ्या कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.

0000

Comments

Popular posts from this blog

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाची थेट कर्ज योजना

बुलढाणा जिल्ह्याची महान हो कीर्ती

दत्तक विधान प्रक्रिया; इच्छुक पालकांनी कायदेशीर प्रक्रिया पुर्ण करावी