राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष शेरसिंग डागोर यांचा जिल्हा दौरा

 


बुलढाणा,दि.2 (जिमाका) : महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा) शेरसिंग रुक्कानसिंग डागोर हे मंगळवार व बुधवार दि. 7 व 8 एप्रिल  रोजी बुलढाणा जिल्हा दौऱ्यावर आहे. दौऱ्यामध्ये सफाई कर्मचाऱ्यांच्या समस्या व अडीअडचणी संदर्भात विविध विभागाचा आढावा घेणार आहे.

त्यांच्या दौरा कार्यक्रमानुसार मंगळवार  दि. 7 एप्रिल 2026 रोजी रात्री 8 वाजता शेगाव सर्कीट हाऊस येथे आगमन व राखीव.

बुधवार दि. 8 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजता शेगाव येथून बुलढाणाकडे प्रयाण, दुपारी 12 वाजता सफाई कर्मचारी संघटना सोबत बैठक व चर्चा. दुपारी 2 ते 3 वाजेपर्यंत भोजन व राखीव. दुपारी 3  वाजता जिल्हाधिकारी कार्यालय बुलढाणा येथे हाताने मैला उचलणाऱ्या सफाई कामगांराच्या नियुक्तीस प्रतिबंध करणे व त्यांचे पुनर्वसन करणे बाबतच्या अधिनियम 2013 ची अंमलबजावणी बाबत तसेच सफाई कर्मचाऱ्यांच्या समस्या व अडीअडचणी निवारणाकरीता केलेल्या उपाययोजना संदर्भात आढावा बैठक. बैठकीनंतर पत्रकार परिषद होईल. सायंकाळी 5 वाजता सफाई कर्मच्याऱ्यांच्या वस्त्यांना भेट व चर्चा. त्यानंतर रात्री 7 वाजता बुलढाणा सर्कीट हाऊस येथे मुक्काम.

0000

Comments

Popular posts from this blog

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाची थेट कर्ज योजना

बुलढाणा जिल्ह्याची महान हो कीर्ती

दत्तक विधान प्रक्रिया; इच्छुक पालकांनी कायदेशीर प्रक्रिया पुर्ण करावी