भारतीय सशस्त्र दलात अधिकारी होण्यासाठी विनामुल्य एसएसबी प्रशिक्षण

 


बुलढाणा, दि. 21 (जिमाका):  भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होऊ इच्छिणाऱ्या पात्र युवक-युवतींसाठी महाराष्ट्र शासनातर्फे मोफत पूर्व प्रशिक्षणाची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक येथे दि. 4 ते 13 मे 2026 या कालावधीत एसएसबी (SSB) कोर्स क्र. 65 आयोजित करण्यात आला आहे.

या प्रशिक्षणासाठी निवड झालेल्या उमेदवारांनी दि. 3 मे 2026 रोजी सकाळी 10 वाजता प्रशिक्षण केंद्रात हजर राहणे आवश्यक आहे. प्रशिक्षण कालावधीत उमेदवारांना निःशुल्क प्रशिक्षणासोबतच निवास व भोजनाची सोय उपलब्ध करून दिली जाणार आहे.

सदर प्रशिक्षणासाठी पात्र ठरण्यासाठी उमेदवारांनी Combined Defence Services Examination (CDSE) किंवा National Defence Academy Examination (NDA) परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी व SSB मुलाखतीसाठी पात्रता मिळवलेली असावी. तसेच NCC स्पेशल एन्ट्री, टेक्निकल ग्रॅज्युएट कोर्स किंवा युनिव्हर्सिटी एन्ट्री स्कीम अंतर्गत SSB कॉल लेटर असलेले उमेदवारही अर्ज करू शकतात.

इच्छुक उमेदवारांनी संबंधित जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात निर्धारित तारखेला मुलाखतीस उपस्थित राहावे. मुलाखतीस येताना Department of Sainik Welfare Pune यांच्या अधिकृत संकेतस्थळावरून SSB-65 कोर्सचे प्रवेशपत्र डाउनलोड करून त्याची प्रिंट तसेच आवश्यक परिशिष्टे भरून सोबत आणणे बंधनकारक आहे. अधिक माहितीसाठी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक येथे ई-मेल (training.petenashik@gmail.com) किंवा दूरध्वनी क्रमांक ०२५३-२४५१०३२ तसेच व्हॉट्सअॅप क्रमांक ९१५६०७३३०६ वर कार्यालयीन वेळेत संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाची थेट कर्ज योजना

बुलढाणा जिल्ह्याची महान हो कीर्ती

दत्तक विधान प्रक्रिया; इच्छुक पालकांनी कायदेशीर प्रक्रिया पुर्ण करावी