माजी सैनिकांसाठी मानधनावर कंत्राटी पदभरती; १२ नोव्हेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन
बुलढाणा दि.28
(जिमाका): येथील
महा सैनिक प्रशिक्षण केंद्रात शिक्षण व शारीरिक प्रशिक्षण प्रशिक्षक या पदावर माजी
सैनिकांची मानधनावर कंत्राटी पद्धतीने भरती करण्यात येणार आहे. या पदासाठी जिल्ह्यातील
इच्छुक माजी सैनिकांनी १२ नोव्हेंबर २०२६ पर्यंत अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा
सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे.
महा सैनिक प्रशिक्षण केंद्र, बुलढाणा येथे माजी सैनिक प्रवर्गातून
तात्पुरत्या स्वरूपात ही पदभरती करण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी आपले माजी सैनिक
ओळखपत्र, सेवापुस्तक, पीपीओ तसेच वैयक्तिक अर्जासह आवश्यक कागदपत्रे महा सैनिक प्रशिक्षण
केंद्र (सागवन), बुलढाणा येथे सादर करावीत.
पदासाठी आवश्यक पात्रता : उमेदवार सशस्त्र सेना दलातून
निवृत्त झालेला माजी सैनिक असावा. वय ५८ वर्षांपेक्षा जास्त नसावे. निवृत्तीच्या वेळी
थलसेनेतील हवालदार किंवा त्यापेक्षा वरिष्ठ पदावरील, अथवा नौदल किंवा वायुदलातील समकक्ष
पदावरील सेवा केलेली असावी. मराठी भाषेचे बोलणे, वाचणे व लिहिण्याचे ज्ञान आवश्यक आहे.
दहावीची परीक्षा मराठी विषय घेऊन उत्तीर्ण झाल्याचे गुणपत्रक असणे आवश्यक आहे.
उमेदवार शारीरिकदृष्ट्या सुदृढ असावा, शिक्षण व शारीरिक
प्रशिक्षण अभ्यासक्रमासाठी पात्र असणे आवश्यक आहे. महाराष्ट्र राज्याचे रहिवासी प्रमाणपत्र
असणे आवश्यक, शारीरिक अभ्यासक्रम उत्तीर्ण असणे आवश्यक राहिल. पात्र माजी सैनिकांनी
विहित मुदतीत आवश्यक कागदपत्रांसह अर्ज सादर करून या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन
करण्यात आले आहे.
00000
Comments
Post a Comment