उत्कृष्ट खेळाडू, माजी सैनिक, पत्नी, पाल्यांना मिळणार विशेष गौरव पुरस्कार

 

Ø  25 सप्टेंबरपर्यंत आवश्यक कागदपत्रे सादर करण्याचे आवाहन

बुलढाणा दि. 15 (जिमाका) : बुलढाणा जिल्ह्यातील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळातील पुरस्कार प्राप्त खेळाडू, साहित्य, संगीत, गायन, वादन, नृत्य इत्यादी क्षेत्रातील पुरस्कार विजेते, यशस्वी उद्योजकांचा पुरस्कार मिळविणारे, संगणक क्षेत्रात अतिउत्कृष्ट कामगिरी करणारे, पुर, जळीत, दरोडा अपघात व इतर नैसर्गिक अपत्तीमध्ये बहुमोल कामगिरी करणारे तसेच देश, राज्याची प्रतिष्ठा वाढवतील अशा स्वरुपाचे लक्षणीय काम करणारे माजी सैनिक, पत्नी, पाल्य यांना अशा कार्याबद्दल त्यांच्या सन्मानार्थ राष्ट्रीय स्तरासाठी 25 हजार रुपये व आंतरराष्ट्रीय स्तरासाठी 50 हजार रुपयांचा विशेष गौरव पुरस्कार सैनिक कल्याण विभागाकडून दिला जातो. तसेच 10 वी व 12 वी बोर्डाच्या परीक्षेत 90 टक्के पेक्षा जास्त गुण मिळवून उत्तीर्ण होणाऱ्या शैक्षणिक बोर्डातून फक्त 10 माजी सैनिक पाल्यांना 20 हजार रुपयाचा विशेष गौरव पुरस्कार सैनिक‍ कल्याण विभागाकडून दिला जातो.

वरील निकष पात्र माजी सैनिक, पत्नी, पाल्य यांनी सर्व आवश्यक कागदपत्रे गुरुवार, दि. 25 सप्टेंबर 2025 पर्यंत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, बुलढाणा येथे जमा करण्याचे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, बुलढाणा यांनी केले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

news 9.6.2017 dio buldana

ग्रामपंचायत सदस्य पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर; हरकती व सूचना २५ जूनपर्यंत मागविल्या