पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठातर्फे अकोला येथे तीन दिवसीय शिवार फेरीचे आयोजन
शिवार फेरीचा जास्तीत जास्त संख्येने लाभ घ्यावा-
कृषि विज्ञान केंद्र, बुलढाणाचे शेतकऱ्यांना आवाहन
बुलढाणा, दि. 16 (जिमाका): विद्यापीठ स्थापना दिनाचे औचित्य साधून
यावर्षी डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला यांची शिवार फेरी दि. 20
सप्टेंबर ते 22 सप्टेंबर, 2025 दरम्यान आयोजित करण्यात आली असून या
कार्यक्रमाचे उद्घाटन दि. 20 सप्टेंबर, 2025 रोजी सकाळी 11
वा. मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांच्या शुभ हस्ते होणार आहे.
या शिवार फेरीचे
म्हणजे थेट प्रात्यक्षिक कार्यक्रमाचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे शेतकरी, संशोधक,
धोरणकर्ते व उद्योगधंदे भागधारक आदींना कृषी तंत्रज्ञानाची देवाण-घेवाण
करण्यासाठी, अत्याधुनिक कृषी पद्धतीबद्दल जाणून घेण्यासाठी व शाश्वत आणि
पर्यावरणास अनुकूल पद्धतीची खात्री करून पीक उत्पादकता वाढवण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध
करून देणे असे असून या तीन दिवसीय शिवार फेरीमध्ये वैशिष्ट्यपूर्ण बाबींचा समावेश
आहे. त्यानुसार-300 खरीप पिक उत्पादन तंत्रांचे 25 एकर क्षेत्रावर एकाच ठिकाणी
प्रात्यक्षिके ( तृणधान्य,कडधान्य, नगदी पिके, तेलबिया, भाजीपाला, फळपिके, चारा
पिके) -विविध खाजगी कृषि निविष्ठा कंपन्यांची थेट
प्रात्यक्षिके, या तीन दिवसांमध्ये राज्यातील एकूण 1 लाख शेतकरी शिवार फेरी मध्ये
सहभागी होतील असे अपेक्षित आहे. विद्यापीठाच्या विविध संशोधन विभागाचे
1100 हेक्टर क्षेत्र शेतकऱ्यांना प्रात्यक्षिक म्हणून पाहण्याची संधी उपलब्ध होणार
आहे. आपल्या प्रदेशातील कृषी क्षेत्रासमोरील आव्हाने व संधी
यावर चर्चासत्र आयोजित करण्यात येणार आहे.
“भव्य स्वरुपात कृषी उत्पादन तंत्रज्ञानाचे थेट
प्रक्षेत्रावर प्रात्यक्षिके पाहण्याची आणि कृषी शास्त्रज्ञांशी चर्चा करण्याची
संधी शेतकऱ्यांना डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला यांनी दिलेली आहे. या
शिवार फेरीच्या कार्यक्रमात शेतकऱ्यांची एकाच वेळी गर्दी होऊ नये म्हणून बुलढाणा
जिल्ह्यासाठी नियोजित असलेल्या दिवशी म्हणजेच दि. 20 सप्टेंबरला बुलढाणा
जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने याशिवार फेरीचा लाभ घ्यावा,” असे आवाहन कृषि विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ
तथा प्रमुख डॉ.अमोल एस. झापे यांनी केले.
0000
Comments
Post a Comment