ओबीसी, ईबीसी व डीएनटी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना पीएम यशस्वी अंतर्गत उच्च दर्जाचे शिक्षण

 

Ø  9 वी ते 12 वीतील विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

Ø  30 सप्टेंबरपर्यंत मुदत

 बुलडाणा, दि. 29 सप्टेंबर (जिमाका): आर्थिकदृष्टया दुर्बल घटकातील गुणवंत विद्यार्थ्यांना नामांकित दर्जेदार शिक्षण मिळण्यासाठी इतर मागास बहुजन कल्याण विभागाअंतर्गत इयत्ता 9 वी ते 12 वी वर्गात शिकणाऱ्या ओबीसी, ईबीसी व डीएनटी विद्यार्थ्यांसाठी केंद्र शासनानची पीएम यशस्वी टॉप क्लास स्कुल एज्युकेशन शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येत आहे. प्रधानमंत्री यशस्वी अंतर्गत विद्यार्थ्यांना शाळांमध्ये उच्च दर्जाचे शिक्षण मिळणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र विद्यार्थ्यांनी 30 सप्टेंबरपर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण विभगाचे सहाय्यक संचालक मनोज मेरत यांनी केले आहे.

या टॉप क्लास एज्युकेशन योजनेअंतर्गत जिल्ह्यातील शाळांची निवड करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत इयत्ता 9 वी ते 12 वी वर्गात शिकणाऱ्या पात्र विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टल scholarships.gov.in या संकेतस्थळावर 30 सप्टेंबरपर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करणे आवश्यक आहे. अर्जासोबत जात प्रमाणपत्र, उत्पन्न प्रमाणपत्र, आधार कार्ड, गुणपत्रक, शाळा प्रवेश प्रमाणपत्र, बँक खात्याचे तपशील, पासपोर्ट फोटो अपलोड करणे अनिवार्य आहे. अर्ज करतांना मोबाईल क्रमांक, ईमेल आयडी असणे आवश्यक आहे. पात्र शाळांनी मुदतीत विद्यार्थ्यांचे अर्ज करावेत, असे आवाहन सहाय्यक संचालक मनोज मेरत यांनी केले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाची थेट कर्ज योजना

बुलढाणा जिल्ह्याची महान हो कीर्ती

स्वयं अर्थसहाय्यिता नवीन शाळांना मान्यता व दर्जावाढीची शिफारस; हरकती मागविल्या