खामगाव येथे सोमवारी पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा
बुलढाणा, दि. 4 (जिमाका) : जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींना
रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता
मार्गदर्शन केंद्र तथा मॉडेल करिअर सेंटर, बुलढाणा आणि मुलभूत प्रशिक्षण तसेच अनुषंगिक
सूचना केंद्र (B.T.R.I.) खामगाव यांच्या संयुक्त विद्यमाने पंडित दिनदयाल उपाध्याय
रोजगार मेळावा/प्लेसमेंट ड्राईव्ह सोमवार, दि. ८ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी १० वाजता शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था खामगाव
येथे आयोजित करण्यात आला आहे.पात्र इच्छुक युवक-युवतींनी या संधीचा लाभ घ्यावा, असे
आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त
ग. प्र. बिटोडे यांनी केले आहे.
या रोजगार मेळाव्यात विविध नामांकित कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित
राहून उमेदवारांच्या मुलाखती घेणार असून, प्राथमिक निवड प्रक्रियाही करण्यात येणार
आहे. तसेच निवड झालेल्या उमेदवारांना कंपन्यांमध्ये प्रत्यक्ष प्रशिक्षणाची संधी उपलब्ध
होणार आहे.
दहावी, बारावी, आय.टी.आय. तसेच पदवीधर अशा शैक्षणिक पात्रतेचे पुरुष
आणि महिला उमेदवार या रोजगार मेळाव्यात सहभागी होऊ शकतात. उमेदवारांना आपल्या शैक्षणिक
पात्रतेच्या आधारे एकापेक्षा जास्त पदांसाठी मुलाखत देण्याची संधी असेल. इच्छुक उमेदवारांनी
आवश्यक कागदपत्रांसह सकाळी १० वाजता स्वखर्चाने आयटीआय खामगाव येथे हजर राहून नोंदणी
करावी. यासंदर्भात अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन
केंद्र, बुलढाणा येथे (दूरध्वनी क्रमांक – ०७२६२-२४२३४२) संपर्क साधावा, असेही कळविण्यात
आले आहे.
00000
Comments
Post a Comment