प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेअंतर्गत मच्छीमारांसाठी अपघात गटविमा संरक्षण
बुलढाणा, दि. १९ (जिमाका) : मत्स्यव्यवसाय हा धोका पत्करून केला जाणारा उपजीविकेचा मुख्य आधार असून, मच्छीमारांच्या सुरक्षिततेसाठी केंद्र शासन व राज्य शासनामार्फत प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेअंतर्गत अपघात गटविमा योजना कार्यान्वित करण्यात आली आहे.
या योजनेअंतर्गत मासेमारीदरम्यान अपघाती मृत्यू किंवा पूर्णतः, कायमचे
अपंगत्व आल्यास प्रत्येकी रु.५ लाखांचे विमा संरक्षण दिले जाते. अंशतः अपंगत्व आल्यास
रु.२.५० लाखांचे विमा संरक्षण मिळते. तसेच वैद्यकीय उपचारासाठी रु.२५ हजारापर्यंतचा
खर्च या योजनेतून भागविला जातो.
सदर योजना राष्ट्रीय मत्स्यिकी विकास मंडळ, हैद्राबाद यांचेमार्फत कार्यान्वित
असून विम्याचा प्रीमियम केंद्र शासन व राज्य शासन यांच्या तर्फे अदा करण्यात येतो.
मत्स्यव्यवसाय करणारे मत्स्यशेतकरी व व्यवसायाशी प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष निगडीत व्यक्ती,
मत्स्यउद्योजक, मत्स्य विक्रेते, मच्छीमारांनी या योजनेचा लाभ घ्यावा, आपल्या कुटुंबाचे
व स्वतःचे भविष्य सुरक्षित करावे, असे आवाहन सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय तांत्रिक
बुलढाणा कार्यालयामार्फत करण्यात येत आहे.
000
Comments
Post a Comment