शिक्षक मतदारसंघ मतदार नोंदणी कार्यक्रम : जिल्हाधिकाऱ्यांची राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक संपन्न

 




 बुलढाणा, दि. 30 (जिमाका): अमरावती विभागातील शिक्षक विधानपरिषद मतदारसंघाच्या मतदार नोंदणी कार्यक्रमासंदर्भात राजकीय पक्षांना माहिती देण्यासाठी सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी बैठक संपन्न झाली.

            या बैठकीला उपजिल्हाधिकारी सुहासीनी गोणेवार, उपशिक्षणाधिकारी (मा) आशिष वाघ, भाजपाचे मंदार बाहेकर, अजित गुऱ्हे, काँग्रेसचे सुनिल सपकाळ, सीपीएमचे जितेंद्रकुमार चोपडे,  राष्ट्रवादी काँग्रेस (श.प) चे ज्ञानेश्वर शेळके, काँग्रेसचे ए. आर. राजपुत, शिवसेना (उ.बा.ठा) चे लखन गाडेकर, मनसेचे  अमोल पाटील, बहुजन समाज पार्टीचे सुरेश चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे एस.टी. सोनोने, शिवसेना (शिंदे) चे दिलीप सरकटे आदी उपस्थित होते.

            या बैठकीत जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी मतदार नोंदणी कार्यक्रमाच्या टप्प्यांची माहिती देतांना म्हणाले,  मागच्या निवडणुकीत 7,784 मतदार होते. जुन्या मतदार याद्या ऐवजी आता नव्याने मतदार याद्या तयार करण्यात येणार आहे. मतदार अधिकाऱ्यांची नावे जाहीर झाले आहेत. त्यांच्याकडे  पात्र मतदारांना फॉर्म 19 मध्ये माहिती भरुन आवश्यक कागदपत्रासह अर्ज सादर करावे लागणार आहे. माध्यमिक शाळेपेक्षा कमी दर्जा नसलेल्या मान्यताप्राप्त शैक्षणिक संस्थामधील 3 वर्ष पूर्णवेळ कार्यरत असलेले शिक्षक मतदार नोंदणीस पात्र राहणार आहे. राजकीय पक्षांना एक गठ्ठा मतदार नोंदणीचे अर्ज करता येणार नाही, अशी माहिती त्यांनी या बैठकीत दिली.

00000

Comments

Popular posts from this blog

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाची थेट कर्ज योजना

बुलढाणा जिल्ह्याची महान हो कीर्ती

स्वयं अर्थसहाय्यिता नवीन शाळांना मान्यता व दर्जावाढीची शिफारस; हरकती मागविल्या