अनुसूचित जाती युवक-युवतींसाठी उद्योजकता विकास प्रशिक्षण

 


बुलढाणा, (जिमाका) दि. 24: अनुसूचित जाती प्रवर्गातील युवक व युवतींसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था(बार्टी), पुणे पुरस्कृत व महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र (एमसीईडी) बुलडाणा यांच्या संयुक्त विद्यमाने एक महिन्याचा उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. हा कार्यक्रम दि. 8 ऑक्टोबर ते 12 नोव्हेंबर 2025 या कालावधीत बुलडाणा येथे होणार आहे.

या प्रशिक्षणामध्ये उद्योजकीय व्यक्तिमत्व विकास, विविध उद्योगातील संधी, अन्नप्रक्रिया, कृषी प्रक्रिया, बेकरी उत्पादने, दुग्धजन्य प्रक्रिया, उद्योग उभारणीची प्रक्रिया, बाजारपेठ सर्वेक्षण, प्रकल्प अहवाल तयार करणे, उद्योगांना लागणाऱ्या विविध नोंदणी व परवाने, शासकीय योजनांची माहिती, उद्योगांना भेटी तसेच अभिप्रेरणा प्रशिक्षण या विषयांवर मार्गदर्शन केले जाणार आहे.

पात्रता व कागदपत्रे : उमेदवारांचे वय 18 ते 45 वर्षे असावे, शाळा सोडल्याचा दाखला (टी.सी.),  मार्कशीट,  जातीचा दाखला, पॅनकार्ड, आधारकार्ड, पासपोर्ट साईज फोटो(झेरॉक्स प्रतींसह) व आवश्यक कागदपत्रासह एमसीईडी बुलडाणा कार्यालय, जिल्हा उद्योग केंद्र येथे किंवा 8275093201 वर संपर्क करावा. इच्छुक उमेदवारांनी वेळेत नोंदणी करून या प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रकल्प अधिकारी यांनी केले आहे.

0000

Comments

Popular posts from this blog

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाची थेट कर्ज योजना

बुलढाणा जिल्ह्याची महान हो कीर्ती

स्वयं अर्थसहाय्यिता नवीन शाळांना मान्यता व दर्जावाढीची शिफारस; हरकती मागविल्या