खेलो इंडिया राज्य निपुणता केंद्रातंर्गत शूटिंग खेळाची निवड चाचणी; 25 सप्टेंबरला उपस्थित राहण्याचे आवाहन

 


बुलडाणा, (जिमाका) दि. 22 :  आंतरराष्ट्रीय खेळाडू निर्माण करण्यासाठी केंद्र शासनाच्या भारतीय क्रीडा प्राधिकारणाच्या वतीने खेलो इंडिया राज्य निपुणता केंद्रातंर्गत शूटिंग खेळाची निवड चाचणी दि. 25 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 9 वाजता शिवछत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे, बालेवाडी, पुणे येथे आयोजित करण्यात आली आहे.

निवड चाचणीमध्ये खेळाची चाचणी समितीमार्फत घेऊन गुणानुक्रमे निश्चित केला जाणार आहे. त्याकरिता जिल्ह्यातील शुटिंग खेळाचे इच्छुक खेळाडूंनी जिल्हा क्रीडा कार्यालयात दि. 23 सप्टेंबरपर्यंत संदीप केळे (मो.नं. 9423446516) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी बि.एस. महानकर यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाची थेट कर्ज योजना

बुलढाणा जिल्ह्याची महान हो कीर्ती

स्वयं अर्थसहाय्यिता नवीन शाळांना मान्यता व दर्जावाढीची शिफारस; हरकती मागविल्या