जिल्हास्तरीय आकस्मिक पिण्याचे पाणी निश्चिती समितीची सभा 5 ते 15 ऑक्टोबरदरम्यान
बुलढाणा, दि.
4 (जिमाका): सन 2025-26 या वर्षाकरिता बुलढाणा जिल्हास्तरीय
आकस्मिक पिण्याचे पाणी निश्चिती समितीची सभा पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत दिनांक 5
ऑक्टोबर ते 15 ऑक्टोबर 2025 दरम्यान आयोजित करण्यात येणार आहे.
जिल्ह्यातील विविध पाटबंधारे प्रकल्पांवरून पिण्याचे पाणी आरक्षणाबाबत
मागणी सादर करण्यासाठी सर्व नगरपरिषदा, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, पंचायत समित्या
तसेच संबंधित ग्रामपंचायतींनी आपली मागणी २५ सप्टेंबर २०२५ पूर्वी न चुकता कार्यकारी
अभियंता, बुलढाणा पाटबंधारे विभाग, बुलढाणा यांच्याकडे सादर करावे, असे आवाहन करण्यात
आले आहे.
सदर सभेत प्रकल्पांमधील उपलब्ध पाणी साठ्याचा आढावा घेऊन पिण्याच्या
पाण्याच्या आरक्षणास मंजुरी देण्यात येणार आहे. त्यामुळे सर्व संबंधित बिगर सिंचन आरक्षण
करणाऱ्या संस्थांनी याची नोंद घ्यावी, असे कार्यकारी अभियंता, बुलढाणा पाटबंधारे विभाग
यांनी कळविले आहे.
00000
Comments
Post a Comment