बाल न्याय अधिनियमांतर्गत निवारा संस्थेसाठी इमारत भाडेतत्वावर देण्याबाबत आवाहन
बुलढाणा दि. 15 (जिमाका) : बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम 2015 व सुधारित अधिनियम 2021 नुसार जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, बुलढाणा यांच्या अधिनस्त अधीक्षक, शासकीय निरीक्षणगृह, बालगृह (मुलींचे कनिष्ठ, वरिष्ठ), बुलढाणा या संस्थेसाठी 6 ते 18 वयोगटातील अनाथ, निराधार, निराश्रीत व विधीसंघर्षित प्रवेशितांच्या निवासासाठी व कार्यालयीन कामकाजासाठी सर्व सोयी-सुविधांनी युक्त किमान 4 हजार चौ.फुट बांधकाम क्षेत्र असलेली इमारत भाडेत्त्वावर घ्यायची आहे.
बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम
2015 व महाराष्ट्र राज्य नियम 2018 मधील निकषानुसार इमारत उपलब्ध असलेला व नमूद संस्थेसाठी
शासकीय दराने इमारत भाडेतत्त्वावर देण्यास इच्छुक असलेल्या इमारत मालकांनी इमारत मालकीच्या
कागदपत्रांसह वृत्तपत्रात निवेदन प्रसिध्द झाल्याच्या दिनांकापासून 8 दिवसात अधीक्षक,
शासकीय मुलांचे कनिष्ठ, वरिष्ठ बालगृह, बुलढाणा व्दारा- जिल्हा महिला बाल विकास अधिकारी
कार्यालय, बस स्टँडच्या मागे, जोशी नेत्रालय जवळ, मुठ्ठे ले-आऊट, बुलढाणा 443001 येथे
संपर्क साधून संमतीपत्र सादर करण्याचे आवाहन शासकीय निरीक्षणगृहाचे अधीक्षक सुनील वाठोरे
यांनी केले आहे.
00000
Comments
Post a Comment