मेहकर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थामध्ये विविध पदांसाठी 8 सप्टेंबर रोजी मुलाखती; उमेदवारांनी उपस्थित राहण्याचे आवाहन


बुलढाणा, दि. 2 (जिमाका) : शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, मेहकर, जि. बुलडाणा येथे विविध पदासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. उमेदवारांनी दि. 8 सप्टेंबर 2025 रोजी दुपारी 12.30 वाजेपर्यंत आयटीआय मेहकर येथे मुळ कागदपत्रांसह प्रत्यक्ष मुलाखतीसाठी हजर राहावे, असे आवाहन संस्थेचे प्राचार्य व्ही.बी. ‍‍शिरसाट यांनी केले आहे.

सोलर टेक्निशियनचे(इलेक्ट्रीकल) 2 पदे(ठोक मासिक वेतन), जोडारीचे 1 पद(तासिका तत्वावर), इम्प्लॉयबिलिटी स्कील/कॉम्प्युटर ऑपरेटर 1 पद (तासिका तत्वावर), मेकॅनिक इलेक्ट्रीक व्हेईकल 1 पद(ठोक मासिक वेतन). सर्व पदांसाठी NSQF लेव्हलनुसार ट्रेड सिलेबसप्रमाणे पात्रता आवश्यक आहे. तसेच किमान एक वर्षाचा अनुभव असणे बंधनकारक आहे.

याआधी सदर पदांसाठी मुलाखत दिलेल्या उमेदवारांनी अर्ज करु नये. असे अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही, यांची नोंद घ्यावी. तासिका व मासिक वेतन हे डिजिइटी (DGET) च्या मानदंडानुसार देण्यात येईल. निवड प्रक्रियेबाबतचे सर्व अधिकार हे प्राचार्य, आयटीआय मेहकर यांचेकडे राहतील.

00000

Comments

Popular posts from this blog

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाची थेट कर्ज योजना

बुलढाणा जिल्ह्याची महान हो कीर्ती

स्वयं अर्थसहाय्यिता नवीन शाळांना मान्यता व दर्जावाढीची शिफारस; हरकती मागविल्या