जागतिक कौशल्य स्पर्धा नामांकनासाठी स्किल कॉम्पीटीशन
तरुणांना कौशल्य सादर करण्याची संधी ; 30 सप्टेंबरपर्यंत ऑनलाईन नोंदणीचे आवाहन
बुलडाणा, (जिमाका)
दि. 8: जगातील सर्वांत मोठी व्यवसायिक शिक्षण
व कौशल्य उत्कृष्टता स्पर्धा दर दोन वर्षांनी घेण्यात येत असून ही जागतिक कौशल्य स्पर्धा
सन 2026 मध्ये शांघाई, चीन येथे आयोजित करण्यात येणार आहे. या स्पर्धेत 23 वर्षाखालील
तरुणांना आपली कौशल्ये सादर करण्याची संधी असून तरुणांनी या स्पर्धेत सहभाग घेण्याचे
आवाहन करण्यात आले आहे.
यासाठी व्यवसाय शिक्षण
व प्रशिक्षण संचालनालय, सेक्टर स्किल कॉन्सील तसेच विविध औद्योगिक आस्थापनांच्या सहकार्याने
63 विविध क्षेत्रांमध्ये जिल्हा, विभाग व राज्यस्तरावर स्किल कॉम्पीटीशनचे आयोजन करण्यात
आले आहे. या स्पर्धांमधून निवड झालेल्या उमेदवारांची नावे देशपातळीवरून जागतिक नामांकनासाठी
पाठविण्यात येणार आहेत.
या स्पर्धेत सहभागासाठी
वयोमर्यादा हा एकमेव निकष असून 50 क्षेत्रांसाठी उमेदवाराचा जन्म 1 जानेवारी 2004 किंवा
नंतरचा असणे आवश्यक आहे. तर 13 विशेष क्षेत्रांसाठी उमेदवाराचा जन्म 1 जानेवारी
2001 किंवा नंतरचा असणे गरजेचे आहे.
इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी skillindiadigital.gov.in या संकेतस्थळावर भेट देऊन 30 सप्टेंबर
2025 पर्यंत ऑनलाईन नोंदणी करावी, असे
आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त
गणेश बिटोडे यांनी केले आहे.
Comments
Post a Comment