भ्रष्टाचार निर्मूलन समितीची 30 सप्टेंबरला सभा
बुलढाणा, दि. 25: जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली भ्रष्टाचार निर्मूलन समितीची सभा दि.30 सप्टेंबर 2025 रोजी दुपारी 12.30 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, बुलढाणा येथे आयोजित करण्यात येणार आहे.
ज्या व्यक्तींना जिल्हा भ्रष्टाचार निर्मूलन समिती सभा अंतर्गत तक्रारी दाखल करावयाच्या असतील त्यांनी प्रतिज्ञालेखावर तक्रारी स्पष्ट शब्दांत सबळ पुराव्यानिशी समिती समोर दाखल कराव्यात, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी सदाशीव शेलार यांनी केले आहे.
00000
Comments
Post a Comment