अभियानांतर्गत ‘सेवा पंधरवडा’

 बुलढाणा तालुक्यात छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व


बुलढाणा दि. 16 (जिमाका) : महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख, कार्यक्षम व गतिमान करण्यासाठी महसूल विभागांतर्गत क्षेत्रिय स्तरावर ग्रामीण भागात सर्वसामान्य जनता, शतकरी, विद्यार्थी व महिला यांचे महसूल विभागांशी संबंधित दैनंदिन प्रश्नांचे निराकरण करणे व जनतेच्या तक्रारी सत्वर निकालात काढणे करीता छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान अंतर्गत राष्ट्रनेता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनी बुधवार, दि. 17 सप्टेंबर 2025 ते महात्मा गांधी यांच्या जन्मदिनी गुरुवार, दि. 2 ऑक्टोंबर 2025 या कालावधीमध्ये महसूल सेवा पंधरवडा राबविण्यात येणार आहे.

या सेवा पंधरवडामध्ये तीन टप्प्यामध्ये उपक्रम आयोजित केले आहेत. टप्पा क्रमांक एक मध्ये पाणंद रस्ते मोहिम 17 सप्टेंबर 2025 ते 22 सप्टेंबर 2025 शेतरस्ता, शिवार रस्ता, पाणंद रस्ते खुले करणे तसेच टप्पा क्रमांक दोन मध्ये सर्वांसाठी घरे अभियान दि. 23 सप्टेंबर 2025 ते 27 सप्टेंबर 2025 व टप्पा क्रमांक तीन मध्ये नाविण्यपूर्ण उपक्रम मोहीम दि. 28 सप्टेंबर 2025 ते 2 ऑक्टोंबर 2025 मध्ये आदिसेतू, जनसंवाद विभागीय आयुक्त कार्यालयामार्फत राबविण्यात आलेल्या आदिसेतू उपक्रमाच्या धरतीवर जिल्ह्यात दि. 30 सप्टेंबर 2025 रोजी आदिसेतू उपक्रम राबविण्यात येणार आहे. तसेच जनसंवाद अभियानांतर्गत आदर्श गब्राम दत्तक योजना कधील पालकत्व घेतलेल्या अधिकाऱ्यांनी दत्तक गावास भेटी देवून सोबत फॉर्म भरुन घेण्यात येणार आहेत.

बुलढाणा तालुक्यामध्ये पाडळी मंडळ येथील मौजे गुम्मी या गावामध्ये बुलढाणा मंडळातील मौजे येळबगाव, साखळी बु. मंडळातील मौजे कोलवड व म्हसला बु. मंडळातील मौजे म्हसला बु. गावांमध्ये दि. 19 सप्टेंबर रोजी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान राबविण्यात येणार आहे. तसेच मंडळ देऊळघाट मंडळातील मौजे देऊळघाट, मंडळ रायपूर येथील मौजे रायपूर व मंडळ धाड मधील सावळी गावांमध्ये दि. 26 सप्टेंबर 2025 रोजी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान राबविण्यात येणार आहे.

            दि. 19 सप्टेंबर व दि. 26 सप्टेंबर 2025 रोजी घेण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत देणाऱ्या सेवांचा लाभ जास्तीत-जास्त जनतेने घ्यावा, असे आवाहन बुलढाणा तहसिलदार यांनी केल आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाची थेट कर्ज योजना

बुलढाणा जिल्ह्याची महान हो कीर्ती

स्वयं अर्थसहाय्यिता नवीन शाळांना मान्यता व दर्जावाढीची शिफारस; हरकती मागविल्या