‘रेशीम विभाग आपल्या दारी’ अभियानांतर्गत 2 लाख 12 हजाराची मिळेल मजुरी
बुलढाणा दि.
15 (जिमाका) : जिल्हा
रेशीम कार्यालयाकडून ‘रेशीम विभाग आपल्या दारी’ या मोहिमेला सोमवारी प्रारंभ झाला.
योजनेत मनरेगा अंतर्गत एक एकर वृक्ष लागवड जोपासना करण्यासाठी 2 लाख 12 हजार 784 मजुरी
तीन वर्षात दिली जाणार आहे.
जिल्हा रेशीम कार्यालयामार्फत रेशीम विकास
योजना महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून राबविण्यात येत आहे. शेतकऱ्यांनी
मागील दोन वर्षापूर्वी रेशीम योजना राबविण्यासाठी कार्यालयाकडे 500 रुपये प्रती एकर
प्रमाणे नोंदणी केली होती. मात्र, काही कारणास्तव तुती लागवड केली नाही व रेशीम उद्योग
सुरु केला नाही. त्यांना त्यांच्या घरी जावून रेशीम योजनेची माहितीपत्रक व पुन्हा रेशीम
उद्योग सुरु करण्याबाबत आवाहन करण्यात येणार आहे. तसेच त्यांनी तुती लागवड त्यावेळी
का केली नाही याबाबत अभिप्राय घेण्यात येणार आहे. अल्पभूधारक शेतकऱ्यांना या योजनेत
सहभागी केले जाते. एका गावातून कमीत कमी 5 शेतकऱ्यांनी ग्रामसभेच्या संमतीने जिल्हा
रेशीम कार्यालयाकडे ग्राम रोजगार सेवक यांच्या मार्फत अर्ज करावेत. त्यासाठी प्रती
एकर रुपये 500 नोंदणी शुल्क रेशीम कार्यालयात जमा करावे. मनरेगा अंतर्गत एक एकर वृक्ष
लागवड जोपासना करण्यासाठी 2 लक्ष 12 हजार 784 मजुरी तीन वर्षात दिली जाणार आहे. रेशीम
किटक संगोपन गृह बांधकामासाठी मजुरी 66 हजार 456 रुपये तर साहित्यासाठी 1 लाख 53 हजार
दिले जाणार आहेत. असे एकूण 4 लाख 32 हजार 240 तीन वर्षात दिले जाणार आहेत.
बहुभूधारक शेतकऱ्यांसाठी केंद्र पुरस्कृत सिल्क
समग्र-2 या योजनेत सहभाग घेता येईल. तुती वृक्ष लागवडीसाठी 1 एकरसाठी 45 हजार, सिंचन
व्यवस्थेसाठी 45 हजार संगोपनगृह बांधकामासाठी 2 लक्ष 43 हजार 750, संगोपन साहित्यासाठी
37 हजार 50 आणि निर्जंतुकीकरण औषधीसाठी 3 हजार 750 काम पूर्ण झाल्यावर देण्यात येणार
आहे. शेतकऱ्यांनी पर्यात्मक तुती शेतीशी निगडीत रेशीम उद्योग करुन रेशीम कोष निर्मिती
करण्याचे आवाहन जिल्हा रेशीम कार्यालयामार्फत करण्यात आले आहे.
मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांनी या पावसाळ्यात
10 कोटी वृक्ष लागवड पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी उद्दिष्ट दिले आहे. त्यामध्ये या
तुती वृक्ष लागवडीची गणना होणार आहे. रेशीम संचालनालयास 4 कोटीचा लक्षांक देण्यात आला
आहे. त्यापैकी 20 लक्ष (350 एकर) तुती वृक्ष लागवडीचके उद्दिष्ट बुलढाणा जिल्ह्यास
देण्यात आले आहे.
Comments
Post a Comment