बियाणे, औषधे व खतांसाठी शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

 

बुलढाणा दि. 15 (जिमाका) : राष्ट्रीय अन्न सुरक्षा व पोषण अभियानांतर्गत अन्नधान्य पिके व राष्ट्रीय खाद्य तेल अभियान गळीतधान्य पिके सन 2025-26 अंतर्गत रब्बी हंगामामध्ये पीक प्रात्याक्षिके तसेच प्रमाणित बियाणे वितरण या बाबीचे नियोजन करण्यात आले आहे. यासाठी चालू वर्षी हरभरा, ज्वारी, मका, तीळ, करडई, भूईमुंग व मोहरी या पिकांचे महाडीबीटी प्रणालीव्दारे बियाणे या घटकासाठी अर्ज स्वीकारण्यात येणार आहे. पीक प्रात्याक्षिके ही बाब शेतकरी गटामार्फत राबविली जाणार आहे.

            पीक प्रात्याक्षिकासाठी एका शेतकऱ्याला एक एकर मर्यादेत निविष्ठा स्वरुपात अनुदान उपलब्ध करुन दिले जाणार आहे. प्रमाणित बियाणे वितरणासाठी एका शेतकऱ्याला आवश्यक असणाऱ्या बियाण्याचा दोन हेक्टर मर्यादेत लाभ देय असणार आहे. प्रथम अर्ज प्रथम प्राधान्य या पध्दतीने लॉटरी करण्यात येणार आहे.

            या निविष्ठांचा पुरवठा करण्यासाठी लाभार्थ्यांची निवड महाडीबीटी पोर्टलवर केलेल्या अर्जातून ऑनलाईन पध्दतीने करण्यात येणार आहे. त्यासाठी महाडीबीटी पोर्टलवर बियाणे, औषधे व खते या बाबीअंतर्गत शेतकऱ्यांना अर्ज करता येईल. यासाठी जास्तीत-जास्त शेतकरी बांधवांनी mahadbt.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर जावून ऑनलाईन अर्ज करावेत व या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मनोजकुमार ढगे यांनी केले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाची थेट कर्ज योजना

बुलढाणा जिल्ह्याची महान हो कीर्ती

स्वयं अर्थसहाय्यिता नवीन शाळांना मान्यता व दर्जावाढीची शिफारस; हरकती मागविल्या