महाडीबीटीवर 30 सप्टेंबरपर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन
बुलडाणा, (जिमाका)
दि. 4 :
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी
महाडीबीटी प्रणालीवर मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती व इतर योजना राबविण्यात येतात. सन
2025-26 या शैक्षणिक वर्षाकरिता महाडीबीटी प्रणालीवर अर्जाची नोंदणी तसेच सन
2024-25 या शैक्षणिक वर्षातील विद्यार्थी व
महाविद्यालय स्तरावर प्रलंबित असलेल्या अर्जाची त्रुटीपुर्तता करून पात्र अर्ज दि.
30 सप्टेंबर 2025 पर्यंत मंजुरीकरिता समाजकल्याण कार्यालयास ऑनलाईन सादर करण्याचे आवाहन
सहायक आयुक्त यांनी केले आहे.
केंद्र पुरस्कृत भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती (अनुसूचित
जाती प्रवर्ग) योजनेअंतर्गत शिष्यवृत्तीचा केंद्र हिस्सा 60 टक्के केंद्र शासनाकडून
PFMS प्रणालीद्वारे थेट विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यावर जमा करण्यात येतो.
राज्य शासनाकडून शिष्यवृत्तीचा 40 टक्के हिस्सा महाडीबीटी प्रणालीद्वारे संबंधित विद्यार्थी
व महाविद्यालयांना प्रदान करण्यात येतो. तेव्हा, केंद्र शासनाकडून थेट विद्यार्थ्यांना
वितरीत होणारा प्रलंबित केंद्र हिस्सा 60 टक्केबाबत महाविद्यालयाचे प्राचार्य व विद्यार्थी
यांनी त्रुटीची पुर्तता करावी.
अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांकरिता भारत सरकार मॅट्रीकोत्तर
शिष्यवृत्तीचा केंद्र हिश्याचा अदायगी करण्यात आलेल्या बाबतचा तपशिल महाडीबीटी पोर्टलवर
उपलब्ध नसून दुसऱ्या हप्त्याची अदायगीची सद्यस्थिती स्वतंत्ररित्या अर्जनिहाय केंद्र
शासनाच्या PFMS प्रणालीवरून https://pfms.nic.in/Home.aspx या लिंकद्वारे विद्यार्थ्यांना
त्यांच्या संबंधित महाविद्यालयांना उपलब्ध करून घेता येणार आहे. केंद्र शासनाच्या सुधारीत मार्गदर्शक सुचनांनुसार
केंद्र हिस्सा 60 टक्के थेट विद्यार्थ्याच्या आधार संलग्न बैंक खात्यामध्ये वितरीत
होत आहे. तथापि केंद्र शासनाची अदायगी प्रलंबित असल्याबाबत विद्यार्थी, पालक, महाविद्यालय
व स्थानिक संघटना यांचेकडून मोठ्या प्रमाणात पत्रव्यवहार/निवेदन तक्रारी प्राप्त होत
आहेत. सदर बाब ही केंद्र शासनाशी निगडीत असल्याने, तक्रारदारांनी त्यांची तक्रार थेट
पीजी पोर्टलवर (Centralised Public Grievance)
(https://pgportal.gov.in/Home/Lodge Grievance) नोंदणी करावे. तसेच अनुसूचित जाती
प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे बँक खाते थेट आधार संलग्नीकृत करण्याकरिता अथवा विद्यार्थ्यांच्या
आधार संबंधित अडचणींचे निराकरण करण्याकरिता https://base.npcl.org.in/catalog/homescreen
या प्रणालीचा वापर करावा, अशी माहिती समाजकल्याण कार्यालयामार्फत कळविण्यात आली आहे.
0000
Comments
Post a Comment