स्वस्थ नारी, सशक्त परिवार अभियानाचे हतेडी प्राथमिक आरोग्य केंद्रात शुभारंभ

 


बुलडाणा, दि. 26 सप्टेंबर (जिमाका): स्वस्थ नारी, सशक्त परिवार अभियानाची सुरुवात हतेडी प्राथमिक आरोग्य केंद्र येथून झाली असून विशेष शिबिराचे उद्घाटन आज उत्साहात पार पडले. यावेळी हतेडी बु. व परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने लाभ घेतला. 

या कार्यक्रमाचे अध्यक्ष संजय गायकवाड होते. तर हतेडी बु. ग्रामपंचायतीचे सरपंच श्रीकांत जाधव, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अमोल गीते, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. वर्षा गुट्टे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. महेंद्र सरपाते उपस्थित होते.

            आरोग्य शिबिरामध्ये  स्त्रीरोग तज्ञ डॉ. नीलगंधा शिंदे,  त्वचारोग तज्ञ डॉ. पाबीलवार, दंतरोग तज्ञ डॉ. शरद काळे, बालरोग तज्ञ डॉ. भरत लहाने या तज्ज्ञ डॉक्टरांनी शिबिरामध्ये 300 पेक्षा जास्त रुग्णांची तपासणी केली. शिबिराचे यशस्वी आयोजनासाठी डॉ. अरुण जवंजाळ, डॉ. कविता बंगले तसेच संपूर्ण आरोग्य सेवा कर्मचारी वृंद यांनी परिश्रम घेतले.

0000000

Comments

Popular posts from this blog

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाची थेट कर्ज योजना

बुलढाणा जिल्ह्याची महान हो कीर्ती

स्वयं अर्थसहाय्यिता नवीन शाळांना मान्यता व दर्जावाढीची शिफारस; हरकती मागविल्या