मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्तीचे अर्ज महाडीबीटी पोर्टल सुरु -प्रकल्प अधिकारी मोहनकुमार व्यवहारे यांची माहिती

 

Ø  महाविद्यालय आणि विद्यार्थ्यांनी विहीत मुदतीत अर्ज करण्याचे आवाहन

 

बुलढाणा दि. 16 (जिमाका) : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय अकोला कार्यालयाच्या अधिनस्त अकोला, वाशीम व बुलढाणा या तीन जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय, अनुदानित, कायम विना अनुदानित सर्व मान्यता प्राप्त महाविद्यालयांना आणि सर्व अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांनी सन 2025-26 या शैक्षणिक सत्रातील भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती व अन्य शिष्यवृत्ती योजनांचा लाभ घेणेसाठी ऑनलाईन महाडीबीटी प्रणालीवर नवीन अर्ज व नुतनीकरणाचक अर्ज भरण्यासाठी संकेतस्थसळ कार्यान्वित करण्यात आलेला आहे. भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क व इतर शिष्यवृत्ती योजनांची अर्ज महाडीबीटी पोर्टलवरील http://mahadbt.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर विहीत मुदतीत भरण्याबाबत कळविण्यात आले आहे.

11 वी, 12 वी, बी.ए., बीकॉम, बीएससी, एमए, एमकॉम, एमएससी, बीएसडब्लू, एमएसडब्लू, बीलीब, एमलीब, एएनएम, जीएनएम, डीएड, बीएड, एमएड या विद्यापीठाच्या मान्यताप्राप्त अभ्यासक्रमास प्रवेशित असलेले विद्यार्थी तसेच शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभाग, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग, कृषी विभाग, पशुधन, दुग्धव्यवसाय आणि मत्सयव्यवसाय विभाग या विभागांच्या अधिपत्याखालील मान्यता प्राप्त अभ्यासक्रमास प्रवेशित असलेले अनुसूचित जमातीचे विद्यार्थी या योजनेचा लाभ घेवू शकतात.

विद्यार्थ्यांनी अर्ज भरण्यासाठी बोनाफाईड प्रमाणपत्र, जातीचा दाखला, उत्पन्नाचे प्रमाणपत्र, महाराष्ट्राचे अधिवास प्रमाणपत्र, टी.सी., शैक्षणिक मार्कशीट आणि आवश्यक त्या अभ्यासक्रमासाठी जात वैधता प्रमाणपत्र इत्यादी कागदपत्रे आवश्यक आहेत.

विद्यार्थ्यांनी या योजनेची कार्यप्रणाली व सर्व माहितीसाठी आदिवासी विकास विभागाच्या दि. 17 जानेवारी 2022 चे अवलोकन करावे. योजनेबाबत वर नमूद केलेल्या संकेतस्थळावर शासनाकडून वेळोवेळी देण्यात आलेल्या सूचना व कालमर्यादा सर्व विद्यार्थ्यांना बंधनकारक राहील. तेव्हा अनुसूचित जमातीच्या सर्व मॅट्रिकोत्तर विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी मोहनकुमार व्यवहारे यांनी केले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाची थेट कर्ज योजना

बुलढाणा जिल्ह्याची महान हो कीर्ती

स्वयं अर्थसहाय्यिता नवीन शाळांना मान्यता व दर्जावाढीची शिफारस; हरकती मागविल्या