पालकमंत्री ना.मकरंद पाटील यांचा जिल्हा दौरा
बुलढाणा,दि.24
(जिमाका) : राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. मकरंद पाटील हे
दि. 25 ते 27 सप्टेंबर 2025 रोजी जिल्हा नियोजन समितीची बैठक व बुलढाणा अतिवृष्टी भागाची
पाहणीकरीता जिल्हा दौऱ्यावर येणार आहेत.
त्यांच्या
दौरा कार्यक्रमानुसार गुरुवार दि. 25 सप्टेंबर
रोजी वाशिम येथून सोईनुसार(रात्री) शासकीय विश्रामगृह येथे आगमन व मुक्काम. शुक्रवार
दि. 26 रोजी दुपारी 12 ते 2 वाजेपर्यंत नियोजन सभागृह जिल्हाधिकारी कार्यालय बुलढाणा
येथे जिल्हा नियोजन समिती बैठक. त्यानंतर सोईनुसार बुलढाणा जिल्हा अतिवृष्टी पाहणी
दौरा व सोईनुसार शासकीय विश्रामगृह येथे आगमन व मुक्काम.
शनिवार दि. 27 सप्टेंबर 2025 रोजी सोईनुसार शासकीय विश्रामगृह,
बुलढाणा येथून साताराकडे रवाना.
000000
Comments
Post a Comment