वसतिगृह प्रवेशापासून वंचित असलेल्या विद्यार्थ्यांनी आधार, स्वयंम योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन; ऑनलाईन अर्ज 29 सप्टेंबरपर्यंत मागविले

 


बुलढाणा,दि.22 (जिमाका): शैक्षणिक वर्ष 2025-26 मध्ये शासकीय वसतीगृहापासून वंचित असलेल्या इतर मागास वर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना व पंडीत दिनदयाल उपाध्याय स्वयंम योजनांचा लाभ घेण्यासाठी अर्ज मागविण्यात आले आहे. इच्छुक विद्यार्थ्यांनी 29 सप्टेंबर 2025 पर्यंत ऑनलाईन अर्ज करावा, असे आवाहन  इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सहाय्यक संचालक मनोज मेरत यांनी केले आहे.

अर्जाची प्रक्रिया व निवड याद्या http://hmas.mahait.org या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने पार पडणार असून शासन निर्णयातील अटी व शर्ती लागू राहणार आहेत. इच्छुक विद्यार्थ्यांनी आपला अर्ज आवश्यक कागदपत्रांसह सहाय्यक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण जिल्हा कार्यालय, बुलढाणा येथे सादर करावा.

पात्रता :  इयत्ता १२ वी नंतर उच्च शिक्षणासाठी व्यावसायिक अभ्यासक्रमात प्रवेश घेतलेले विद्यार्थी,  शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळाल्याचे प्रमाणपत्र,  इतर मागास वर्ग, विमुक्त जाती-भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग व धनगर समाजातील विद्यार्थी पात्र, किमान 60 टक्के (दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी 50 टक्के गुण),  पालकांचे वार्षिक उत्पन्न 2 लक्ष 50 हजारांपेक्षा जास्त नसावे, कमाल वय 30 वर्षांपर्यंतच पात्र, स्वयंघोषणा पत्र, विद्यार्थी महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असावा तसेच कोणत्याही नोकरी/व्यवसायात नसावा.

00000

Comments

Popular posts from this blog

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाची थेट कर्ज योजना

बुलढाणा जिल्ह्याची महान हो कीर्ती

स्वयं अर्थसहाय्यिता नवीन शाळांना मान्यता व दर्जावाढीची शिफारस; हरकती मागविल्या