नवरात्रोत्सव काळात शहरातील वाहतुकीत बदल
Ø २२ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर दरम्यान पर्यायी मार्ग
बुलढाणा, दि. १९ (जिमाका) : नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होणार
असून मोठी देवी संस्थान, बुलढाणा येथे दहा दिवसांचा उत्सव पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर
वाहतुकीच्या सुनियमन आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी शहरातील वाहतुक ही पर्यायी
मार्गाने वळविण्यात आली आहे. याबाबत जिल्हादंडाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी आदेश जारी
केले आहे.
शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याकरीता तसेच जनतेच्या
सुरक्षिततेसाठी व वाहतुकीच्या सुनियमनासाठी बुलढाणा शहरातील जड वाहतूक 22 सप्टेंबर
ते 2 ऑक्टोबर रोजी रात्री 12 वाजेपर्यंत त्रिशरण चौक, बुलढाणा ते तहसिल चौक, जयस्तंभ
चौक बुलढाणा या रोडवरुन येणाऱ्या वाहतुकीसाठी त्रिशरण चौक -सर्क्युलर रोड -धाड नाका-
जयस्तंभ चौक हा पर्यायी मार्ग आणि जयस्तंभ चौक, तहसिल चौक, बुलढाणा ते त्रिशरण चौक,
बुलढाणा रोड वरुन जाणाऱ्या वाहतुकीसाठी जयस्तंभ चौक, धाड नाका सर्क्युलर रोड - त्रिशरण
चौक हा पर्यायी उपलब्ध करण्यात आला आहे.
या आदेशाचे उल्लंघन केल्याचे निदर्शनास आल्यास मुंबई
पोलीस अधिनियमानुसार कारवाई करण्यात येईल, असा इशारा देखील जिल्हा प्रशासनाकडून देण्यात
आला आहे.
000
Comments
Post a Comment