राज्य परिवहन महामंडळ बुलढाणा येथे शिकाऊ उमेदवारांची भरती

 

Ø  पात्र उमेदवारांनी अर्ज करण्याचे आवाहन

 

बुलढाणा, दि. 17 (जिमाका): महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ बुलढाणा विभागातर्फे सन 2025-26 साठी तांत्रिक, व्यावसायिक व आयटीआय उत्तीर्ण कार्यशाळा शिकाऊ उमेदवार भरती करण्यात येणार आहे. त्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले असून 29 सप्टेंबरपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

या शिकाऊ उमेदवार भरतीमध्ये मेकॅनिक मोटार व्हेईकल (एमएमव्ही) या पदासाठी पदसंख्या 60 असून आयटीआय मेकॅनिक मोटार व्यवसाय उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. मेकॅनिक (डिझेल) या पदासाठी पदसंख्या 29 असून आयटीआय मेकॅनिक (डिझेल) व्यवसाय उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. मोटार व्हेईकल बॉडी बिल्डर (एमव्हीबीबी) या पदासाठी पदसंख्या 30 असून आयटीआय मोटार व्हेईकल बॉडी बिल्डर व्यवसाय उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. इलेक्ट्रीशियन या पदासाठी पदसंख्या 26 असून आयटीआय मोटार व्हेईकल बॉडी बिल्डर व्यवसाय उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. पेंटर या पदासाठी पदसंख्या 6 असून आयटीआय पेंटर व्यवसाय उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. टर्नर या पदासाठी पदसंख्या 2 असून आयटीआय टर्नर व्यवसाय उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. वेल्डर या पदासाठी पदसंख्या 13 असून आयटीआय वेल्डर व्यवसाय उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. वायरमन या पदासाठी पदसंख्या 10 असून आयटीआय वायरमन व्यवसाय उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. मेकॅनिक रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंग या पदासाठी पदसंख्या 7 असून आयटीआय मेकॅनिक रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंग व्यवसाय उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. या पदांसाठी वयोमर्यादा 18 ते 38 वर्षे नेमून देण्यात आलेली आहे. या व्यवसायासाठी आयटीआय उत्तीर्ण उमेदवारांनी www.apprrenticeshipindia.org या संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक आहे.

शिकाऊ उमेदवारीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी नोंदणी केल्यानंतर पोर्टलवरील संकेतस्थळावर दिलेल्या सूचनांप्रमाणे रा. प महामंडळ (एमएसआरटीसी) बुलढाणा विभाग या आस्थापनेसाठी ऑनलाईन अर्ज करावे. याप्रमाणे ऑनलाईन नोंदणी झालेल्या शिकाऊ उमेदवारांसाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांना छापील नमुन्यातील अर्ज भरावे लागतील. हे छापील अर्ज आस्थापना शाखा, राज्य परिवहन महामंडळ, विभागीय कार्यालय, मलकापूर रोड, बुलढाणा येथे दि. 18 सप्टेंबर ते 29 सप्टेंबरपर्यंत सकाळी 10 ते दुपारी 3 या वेळेत स्वीकारले जातील.

या अर्जाची किंमत खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी 590 रुपये तसेच मागासवर्गीय शिकाऊ उमेदवारांसाठी 295 रुपये इतकी असून सदर शुल्क उमेदवाराने राष्ट्रीयकृत बँकेचा डिमांड ड्राफ्टव्दारे MSRTC FUND BULDANA या नावाने काढून अर्जासोबत सर्व कागदपत्रासह राज्य परिवहन महामंडळ, विभागीय कार्यालय, मलकापूर रोड, बुलढाणा या कार्यालयात दि. 29 सप्टेंबर 2025 रोजी दुपारी 5 वाजेपर्यंत सादर करावेत. संकेतस्थळावर जे ऑनलाईन नोंदणी करतील त्याच उमेदवारांना राज्य परिवहन महामंडळ, बुलढाणा विभागामध्ये शिकाऊ उमेदवार म्हणून भरती करण्यात येईल. राज्य परिवहन महामंडळ सन 2025-26 साठी शिकाऊ उमेदवारांनी अर्ज भरण्याचे आवाहन विभाग नियंत्रक, राज्य परिवहन, बुलढाणा यांनी केले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाची थेट कर्ज योजना

बुलढाणा जिल्ह्याची महान हो कीर्ती

स्वयं अर्थसहाय्यिता नवीन शाळांना मान्यता व दर्जावाढीची शिफारस; हरकती मागविल्या