भारतीय सशस्त्र सैन्यदलातील अधिकारी पदाचे मोफत पूर्व प्रशिक्षण !
जिल्ह्यातील युवक-युवतींसाठी संधी ; 15 सप्टेंबर रोजी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय येथे मुलाखती
बुलढाणा, दि. 8 (जिमाका)
: भारतीय सैन्यदल, नौदल आणि वायुदलामध्ये
अधिकारी पदावर भरती होऊ इच्छिणाऱ्या पात्र उमेदवारांसाठी सेवा निवड मंडळ (SSB) परीक्षेच्या
पूर्वतयारी प्रशिक्षणाची संधी उपलब्ध झाली आहे. महाराष्ट्रातील युवक-युवतींसाठी दि.
22 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर 2025 या कालावधीत सेवा निवड मंडळाचे कोर्स क्र. 62 चे प्रशिक्षण
हे छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक येथे आयोजित करण्यात येणार आहे.
या कोर्सदरम्यान उमेदवारांना निःशुल्क प्रशिक्षण, निवास व भोजन सुविधा दिली जाणार आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील
इच्छुक उमेदवारांनी या संधीचा लाभ घेण्यासाठी 15 सप्टेंबर 2025 रोजी जिल्हा सैनिक कल्याण
कार्यालय, बुलढाणा येथे मुलाखतीस उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी
यांनी केले आहे.
मुलाखतीस येताना उमेदवारांनी
सैनिक कल्याण विभाग, पुणे (DSW, Pune) यांच्या संकेतस्थळावरून एसएसबी-62 कोर्ससाठीचे
प्रवेशपत्र आणि परिशिष्टांची प्रिंट काढून पूर्ण भरून आणणे आवश्यक आहे. संबंधित कागदपत्रांची
प्रिंट जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयातूनही मिळवता येणार आहे.
प्रवेशासाठी
आवश्यक पात्रता:
या एसएसबी वर्गामध्ये प्रवेशासाठी उमेदवारांकडे
कोणतीही एक पात्रता असणे आवश्यक आहे. त्यासंबंधित मूळ प्रमाणपत्रे सोबत आणणे बंधनकारक
आहे. त्यानुसार
- कंबाईंड डिफेनस
सर्विसेस एक्झामिनेयन किंवा नॅशनल डिफेंस अकॅडमी परीक्षा उत्तीर्ण असावे व सेवा
निवड मंडळाच्या मुलाखतीसाठी पात्रता मिळालेली असावी.
- एनसीसी 'C' सर्टिफिकेट
'A' किंवा 'B' ग्रेडमध्ये पास झालेले असावेत व एनसीसी ग्रुप हेडक्वार्टरकडून एसएसबीसाठी
शिफारस असणे.
- टेक्निकल ग्रॅज्युएट
कोर्ससाठी एसएसबी मुलाखतीचे कॉल लेटर असणे.
- विद्यापीठ प्रवेय
प्रणालीसाठी एसएसबी चे कॉल लेटर किंवा शिफारस केलेल्या यादीत नाव असणे.
अधिक माहितीसाठी प्रभारी अधिकारी, छात्रपूर्व प्रशिक्षण
केंद्र, नाशिक रोड, नाशिक
ई-मेल: training.petenashik@gmail.com दूरध्वनी क्रमांक ०२५३-२४५१०३२ किंवा ९१५६०७३३०६ या व्हाट्सअॅप क्रमांकावर कार्यालयीन वेळेत संपर्क
साधावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, बुलढाणा यांनी केले आहे.
00000
Comments
Post a Comment