29 सप्टेंबर रोजी जिल्ह्यात “माहिती अधिकार दिन” साजरा होणार
बुलडाणा, दि. 23 (जिमाका): प्रत्येक
वर्षी 28 सप्टेंबर हा दिवस “माहिती
अधिकार दिन” म्हणून साजरा केला जातो. यावर्षी
28 सप्टेंबर हा दिवस रविवारी सुट्टीचा असल्याने, शासनाच्या निर्देशानुसार सोमवार, दि.
29 सप्टेंबर 2025 रोजी “माहिती अधिकार दिन”
साजरा करण्यात येणार आहे.
शासन
निर्णय दि. 20 सप्टेंबर 2008 नुसार माहिती अधिकार दिन साजरा करणे बंधनकारक आहे. त्यानुसार
जिल्हाधिकारी कार्यालय, बुलढाणा येथे दरवर्षीप्रमाणे या वर्षीही कार्यक्रमाचे आयोजन
केले जाणार आहे.
जिल्ह्यातील
सर्व विभागप्रमुखांनी आपल्या कार्यालयात माहिती अधिकार दिन उत्साहात साजरा करावा, तसेच
या निमित्ताने सामान्य जनतेमध्ये माहिती अधिकार कायद्याबाबत जनजागृती होणे अपेक्षित
असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. त्यानुसार यंदाचा माहिती अधिकार दिन सोमवार
29 सप्टेंबर 2025 रोजी जिल्हात साजरा करण्यात येणार आहे, याची नोंद संबंधितांनी घ्यावी
असे आवाहन प्रसिद्धीपत्रकांवर जिल्हा प्रशासनाने केले आहे.
00000
Comments
Post a Comment